मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईतील 'त्या' आत्महत्येवरून भाजपला कात्रीत पकडण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न? केला मोठा गौप्यस्फोट

मुंबईतील 'त्या' आत्महत्येवरून भाजपला कात्रीत पकडण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न? केला मोठा गौप्यस्फोट

भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांच्यावर दबाव होता असे त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांच्यावर दबाव होता असे त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांच्यावर दबाव होता असे त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 28 फेब्रुवारी : संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर झालेल्या आरोपानंतर अखेर आज त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला, आणि बंजारा समाजाविरोधात हे विरोधकांचं षडयंत्र असल्याचा आरोप केला. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत संजय राठोड प्रकरणावर खुलासा केला.

यावेळी ते म्हणाले, आमची जबाबदारी न्यायाने वागणे ही असते. तपास हा झालाच पाहिजे आणि कोणी दोषी असेल तर शिक्षाही झाली पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. मात्र कोणाला मुद्द्याम अडकवता कामा नये. पोलिसांना नि:पक्ष चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या काळातही हीच पोलीस यंत्रणा होती. मात्र आता ते पोलिसांवरच अविश्वास दाखवत आहेत,' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली आहे.

याबरोबरच त्यांनी 22 फेब्रुवारी रोजी मुंबईतील हॉटेल सी ग्रीनमध्ये दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन देलकर (Mohan Delkar) यांच्या आत्महत्येचा उल्लेख केला. पूजा प्रकरणात सुसाइड नोट नाही, त्याशिवाय कोणाचे आरोप नाहीत, तरीही गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. मात्र मोहन देलकर यांच्या आत्महत्येनंतर 13 ते 14 पानांची सुसाइट नोट सापडली आहे. त्यामध्ये अनेक नावांचा उल्लेख असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांच्या आत्महत्या प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यावर कोणतीच चर्चा वा मागणी होत नसल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. दादरा-नगर हवेलीचे प्रशासक डेलकरांचा छळ करीत होते, भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांच्यावर दबाव होता असे त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

हे ही वाचा-देवेंद्र फडवणीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांचा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा हल्ला

'मोहन डेलकर यांनी एक 'सुसाईड नोट' गुजरातीत लिहून ठेवल्याचं समोर आलं आहे. ही नोट खरी असेल तर त्यात डेलकरांनी लिहिल्यानुसार दादरा-नगर हवेलीचे प्रशासक डेलकरांचा छळ करीत होते, भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांच्यावर दबाव होता असे त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. मोहन डेलकरांची आत्महत्या हे साधे प्रकरण वाटत नाही, अशी शंका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही व्यक्त केली आहे. काँग्रेसने तर भाजपच्या त्रासाला कंटाळून डेलकरांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे.

First published:

Tags: Maharashtra, Mohan delkar, Mumbai, Pooja Chavan, Sanjay rathod, Uddhav thackarey