जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / सीटवर बसण्याच्या वादातून लोकलमध्ये युवकाला मारहाण

सीटवर बसण्याच्या वादातून लोकलमध्ये युवकाला मारहाण

सीटवर बसण्याच्या वादातून लोकलमध्ये युवकाला मारहाण

कल्याणहून अंबरनाथच्या दिशेने काल सकळी आठ वाजून सात मिनिटांची लोकल निघाली. नियमीत प्रवास करणाऱ्या एका गटाने दादागिरी करत एका युवकाला मारहाण करत लोकलबाहेर काढलं

  • -MIN READ
  • Last Updated :

    कल्याण,08 सप्टेंबर: कल्याणहून अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये सीटवर बसण्याच्या वादातून एका युवकाला मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कल्याणहून अंबरनाथच्या दिशेने काल सकळी आठ वाजून सात मिनिटांची लोकल निघाली. एक युवक गाडीत चढला. डब्ब्यात एक जागा रिकामी होती. तिथे हा प्रवासी जाऊन बसण्याचा प्रयत्न करत असताना  नियमित प्रवास करणाऱ्या गटाने ही जागा त्यांच्या मित्रासाठी राखीव असल्याचं सांगितलं. नंतर  नियमित प्रवास करणाऱ्या त्या  गटाने दादागिरी करत त्या युवकाला मारहाण करत लोकलबाहेर काढलं. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सीटवर बसण्याच्या क्षुल्लक वादावरून या टोळीने युवकाचा गळा पकडून त्याला डब्ब्याच्या बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात