जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / स्विमिंग पूलमध्ये उलटी उडी मारली अन्.. विरारमधील धक्कादायक व्हिडीओ समोर

स्विमिंग पूलमध्ये उलटी उडी मारली अन्.. विरारमधील धक्कादायक व्हिडीओ समोर

स्विमिंग पूलमध्ये उलटी उडी मारली अन्..

स्विमिंग पूलमध्ये उलटी उडी मारली अन्..

विरारमध्ये 18 वर्षीय तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 5 मे : सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेकांची रिसॉर्टस किंवा वॉटर पार्कमध्ये मौज करण्याला पसंती असते. पण हीच मजा मस्ती कधी कधी जीवावर पण बेतू शकते. विरारच्या एका रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली. त्याचं सीसीटीव्ही फुटेज नुकतंच समोर आलं आहे. 19 एप्रिलला सायंकाळी 4.30 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे एवढ्या गर्दीत तो बुडत असताना कोणाच्याही लक्षात ही गोष्ट आली नाही. काय आहे घटना? सध्या उन्हाळ्याच्या तडाख्यात अनेकजण पोहण्याचा आनंद लुटत आहे. परिणामी स्विंमिंग पूलमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, या गर्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. नालासोपारा येथे रहाणारा हलकी कल्लापा पवार हा 18 वर्षीय तरुण विरारच्या अर्नाळा भागातील क्षितिज रिसॉर्टमध्ये गेला होता. दुपारी साडेचारच्या सुमारास तो पोहोण्यासाठी तरणतलावात उतरला. मात्र, तो पाण्यात  बुडाला. यावेळी आसपास अनेकजण तरणतलावात पोहोत होते. परंतु, हलकी पाण्यात बुडाल्याचे कोणाच्याच लक्षात आले नाही. रीसॉर्टमधील सिसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. हलकीला नजीकच्या संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. विरार पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे.

पोहायला जाताना काळजी घ्या सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. ग्रामीण भागापासून शहरात उन्हाचा तडाखा कमी करण्यासाठी अनेकजण पोहायला जातात. वॉटर पार्क आणि स्विमिंग पूलमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, हीच गर्दी तुमच्या जीव जाण्याला कारणीभूत ठरू शकते. अनेकदा गर्दीमध्ये कोणी पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येत नाही. त्यामुळे तुम्ही किंवा तुमची मुलं पोहायला जात असेल तर त्यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. बहुतेक ठिकाणी सुरक्षा रक्षक असतात. मात्र, गर्दीत दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. जर पोहायला येत नसेल तर काळजी घेऊनच पाण्यात उतरले पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: virar
  • First Published :
जाहिरात
जाहिरात