जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / हिंमत असेल तर थांबवून दाखवा, मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी

हिंमत असेल तर थांबवून दाखवा, मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी

हिंमत असेल तर थांबवून दाखवा, मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी

27 जुलै : मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना पत्राद्वारे मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रावर इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा उल्लेख आहे. या धमकीपत्राची पोलीस कसून चौकशी करत असून मुंबईतील दहशतवादविरोधी पथकांना हायअलर्ट जारी केला गेला आहे. मुंबईचे आयुक्त राकेश मारिया यांना दोन दिवसांपूर्वी धमकी देणारे एक पानी पत्र मिळाले आहे. ‘1993 मध्ये तुम्ही नशीबवान ठरला होता. मात्र आता हिंमत असेल तर आम्हाला थांबवून दाखवा’ अशी धमकी या पत्राद्वारे देण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    mumbai terror attack 27  जुलै :  मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना पत्राद्वारे मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रावर इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा उल्लेख आहे. या धमकीपत्राची पोलीस कसून चौकशी करत असून मुंबईतील दहशतवादविरोधी पथकांना हायअलर्ट जारी केला गेला आहे.

    मुंबईचे आयुक्त राकेश मारिया यांना दोन दिवसांपूर्वी धमकी देणारे एक पानी पत्र मिळाले आहे. ‘1993 मध्ये तुम्ही नशीबवान ठरला होता. मात्र आता हिंमत असेल तर आम्हाला थांबवून दाखवा’ अशी धमकी या पत्राद्वारे देण्यात आली आहे. पत्राखाली इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे नाव असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हे पत्र कुठून आले, पत्र खरोखरच दहशतवादी संघटनेने पाठवले की खोडसाळपणाने पत्र पाठवण्यात आले याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. तसेच या पत्रानंतर दहशतवादविरोधी पथकाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मुंबईतील बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

    जाहिरात

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

    Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

    +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात