22 नोव्हेंबर :नातं, प्रेम म्हणजे तरी काय असतं ?, याचा शोध ज्यांना लागला तो धन्य झाला पण या नात्याच्या पलीकडे मनाला हेलावणारी एक घटना खाकी वर्दीवाल्यांसोबत घडलीये. नेहमी खाकी वर्दीतला माणूस अर्थात पोलीस हा कायद्याचा, समाजाचा रक्षक असतो पण आपला एक साथीदार जो एक श्वान होता त्याच्या निधनानं हा माणूसही स्तब्ध झाला. मुंबई पोलीस बॉम्बशोधक पथकातील सेवेतून काही दिवसांपुर्वीच निवृत्त झालेला डॉग प्रिन्सचं साखराबाई हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी हार्ट ऍटॅक आणि किडनीच्या आजारानं निधन झालं. मुंबई पोलीस दलातील आपल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत प्रिन्सनं अतिशय उत्तम कामगिरी करत पोलीस दलाला मोठे सहकार्य केलं होतं. 2007 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामधील शोधकामात तसंच बांद्र्यातील हॉटेल सिरॉकमधील बॉम्ब शोधण्यात प्रिन्सचे मोठे योगदान होतं. याबरोबरच 26/11 च्या हल्ल्याच्या वेळी चार जिवंत बॉम्ब आणि 17 हँन्डग्रेनेड शोधण्याचं काम प्रिन्सनेच केलं होतं. प्रिन्सच्या निधनाची बातमी ही अहोरात्र झटणार्या पोलीस साथीदारांना चटका लावून जाणारी होती. प्रिन्सची देखभाल करणारे कर्मचारी आणि पोलीस अधिकार्यांनी आपल्या लाडक्या साथीदारांला मोठ्या सन्मानाने अखेरचा निरोप दिला. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++