जाहिरात
मराठी बातम्या / मनी / झोमॅटोमध्ये धक्कासत्र सुरू, तुमच्याकडे असतील शेअर तर हे नक्की वाचा

झोमॅटोमध्ये धक्कासत्र सुरू, तुमच्याकडे असतील शेअर तर हे नक्की वाचा

झोमॅटोमध्ये धक्कासत्र सुरू, तुमच्याकडे असतील शेअर तर हे नक्की वाचा

एकीकडे इमेज सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू असताना पुन्हा एक राजीनामा पडला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई: झोमॅटोची इमेज सुधारण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या कंपनीतील धक्कासत्र काही केल्या संपत नाही. एकामागून धक्के मिळत आहेत. दोन महिन्यात चार मोठ्या पदावरच्या लोकांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कंपनीला मोठा फटका बसला आहे. एकीकडे इमेज सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू असताना पुन्हा एक राजीनामा पडला आहे. फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मचे को फाउंडर चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर CTO गुंजन पाटीदार यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर झोमॅटोला याचा फटका शेअर मार्केटमध्ये देखील सहन करावा लागला. एका धक्क्यातून सावरण्याआधीच आता शेअर मार्केटमध्ये झेमॉटोचे शेअर 4 टक्क्यांनी कोसळले आहेत. अनेक दिवसांपासून कंपनीचे मोठ्या पदावरचे अधिकारी एकापाठोपाठ एक राजीनामा देत आहेत. आता या यादीत गुंजन पाटीदार यांच्या नावाचाही समावेश आहे. पंकज चढ्ढा, गौरव गुप्ता आणि मोहित गुप्ता यांच्यानंतर कंपनीतून बाहेर पडणारे ते चौथे सहसंस्थापक आहेत. 2018 मध्ये चढ्ढा आणि २०२१ मध्ये गौरव गुप्ता बाहेर पडले होते. पाटीदार यांनी कंपनीसाठी कोअर टेक सिस्टिम तयार केली होती. गुरुग्रामस्थित झोमॅटोने सांगितले की, गेल्या 10 वर्षांहून अधिक काळात त्यांनी टेक लीडरशीप टीमही तयार केली होती. आता नेमकं त्यांनीच राजीनामा दिल्यामुळे टीमला मोठा धक्का बसला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

शेअर मार्केटमध्ये झोमॅटोला गेल्या दोन महिन्यांमध्ये झोमॅटोच्या शेअर्सला मोठा फटका बसला आहे. आताही पाटीदार यांनी राजीनामा दिल्यानंतर झोमॅटोचे शेअर्स पडले आहेत. याशिवाय झोमॅटोने काही सेवा बंद केल्या आहेत. त्यामुळे ग्राहक देखील नाराज आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: money , Zomato
  • First Published :
जाहिरात
जाहिरात