मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Zomato ला तिसरा धक्का, को-फाउंडर मोहित गुप्तांचा राजीनामा

Zomato ला तिसरा धक्का, को-फाउंडर मोहित गुप्तांचा राजीनामा

Zomato ला तिसरा धक्का, 2 आठवड्यात तिसरा राजीनामा; को-फाउंडर मोहित गुप्तांचा राजीनामा

Zomato ला तिसरा धक्का, 2 आठवड्यात तिसरा राजीनामा; को-फाउंडर मोहित गुप्तांचा राजीनामा

Zomato ला तिसरा धक्का, 2 आठवड्यात तिसरा राजीनामा; को-फाउंडर मोहित गुप्तांचा राजीनामा

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : एकीकडे जगात अर्थिक मंदीचे संकेत मिळत आहे. तर दुसरीकडे ट्विटर, झोमॅटो आणि मेटामध्ये अनेक बदल होत आहे. त्यापाठोपाठ झोमॅटोमध्येही एक मोठा बदल झाला आहे. झोमॅटोच्या वरिष्ठ व्यवस्थापनात सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळाले आहेत.

दोन बड्या अधिकाऱ्यांनी एकापाठोपाठ एक कंपनीपासून राजीनामा देऊन वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आता झोमॅटोचे सहसंस्थापक मोहित गुप्ता यांनीही राजीनामा दिल्याने परिस्थितीचे गांभीर्य समोर आले आहे. मोहित गुप्ता हे गेल्या साडेचार वर्षांपासून कंपनीमध्ये काम करत होते.

त्यांच्या तडकाफडकी राजीनाम्याचे कारण समोर आलेले नाही. याआधी नोव्हेंबर महिन्यात कंपनीच्या आणखी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंपनीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. झोमॅटो सध्या मोठ्या तोट्यात आहे. कोरोनानंतर या सगळ्यातून सावरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीमध्ये हा मोठा धक्का कंपनीला आहे.

गेल्या दोन आठवड्यांतील हा तिसरा मोठा राजीनामा आहे. राजीनामा दिल्यानंतर मोहितने आता एखाद्या गुंतवणूकदाराप्रमाणेच कंपनीशीही जोडले जाणार असल्याचे स्पष्ट केले. या आठवड्याच्या सुरुवातीला झोमॅटोचे नवीन उपक्रम प्रमुख राहुल गंजू यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला.

गेल्या 5 वर्षांपासून ते कंपनीशी संबंधित होते. 7 नोव्हेंबर रोजी कंपनीच्या ग्लोबल ग्रोथचे उपाध्यक्ष सिद्धार्थ झंवर यांनीही आपला राजीनामा कंपनीकडे सुपूर्द केला. सध्या कंपनी अनेक आव्हानांना तोंड देत असून काम करण्याच्या पद्धतीबाबत मोठे निर्णय घेत आहे.

कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे की युएईमधील त्यांची सेवा २४ नोव्हेंबरपासून बंद होईल. जे ग्राहक त्यांच्या अॅपवर युएईमध्ये ऑर्डर करतील त्यांना दुसऱ्या अॅपवर ट्रान्सफर केलं जाणार आहे. झोमॅटोच्या शेअर्सवरही त्याचा परिणाम शेअर मार्केटमध्ये होत असल्याचं पाहायला मिळालं आहे.

सप्टेंबर तिमाहीत कंपनीची एकूण कामगिरी म्हणावी तेवढी चांगली राहिल्याचं दिसलं नाही. कंपनीचा तोटा 251 कोटी रुपयांवर आला आहे. कंपनीने १० नोव्हेंबर रोजी आपला निकाल जाहीर केला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा तोटा 430 कोटी रुपये होता. त्याचबरोबर तिमाहीत कंपनीचे उत्पन्न ६२ टक्क्यांनी वाढून १६६१ कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी कंपनीने 1,024 कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले होते.

First published:

Tags: Inflation, Zomato