जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ट्विटर, मेटानंतर आता Zomatoचा मोठा निर्णय, कंपनीच्या घोषणेनं टेन्शन वाढवलं

ट्विटर, मेटानंतर आता Zomatoचा मोठा निर्णय, कंपनीच्या घोषणेनं टेन्शन वाढवलं

ट्विटर, मेटानंतर आता Zomatoचा मोठा निर्णय, कंपनीच्या घोषणेनं टेन्शन वाढवलं

ट्विटर, मेटानंतर आता Zomatoचा मोठा निर्णय, कंपनीच्या घोषणेनं टेन्शन वाढवलं

ट्विटर आणि फेसबुकची मूळ कंपनी मेटा नंतर आता फूड एग्रीगेटर झोमॅटोनेही कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 नोव्हेंबर:  जागतिक स्तरावर, भारताच्या बाजारपेठेतील अस्थिरतेचा परिणाम खाजगी क्षेत्रावर स्पष्टपणे दिसत आहे. ट्विटर आणि फेसबुकची मूळ कंपनी मेटा नंतर आता फूड एग्रीगेटर झोमॅटोनेही कर्मचाऱ्यांची छाटणी केली आहे. झोमॅटोनं दिलेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या 3 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. फूड एग्रीगेटर अॅप झोमॅटोनं जवळपास 100 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. हे कर्मचारी कंपनीच्या उत्पादन, टेक, कॅटलॉग आणि मार्केटिंग अशा विविध विभागांमध्ये योगदान देत आहेत. कंपनीच्या एकूण कर्मचार्‍यांपैकी सुमारे 3 टक्के कामगारांना कामावरून काढून टाकलं जाणार आहे. झोमॅटोमधील व्यवस्थापनात सातत्याने राजीनामे येत असतानाच आता कर्मचारी कपातीची बातमी समोर आली आहे. कपातीची ताजी बातमी अशा वेळी आली आहे, जेव्हा गेल्या शुक्रवारीच कंपनीचे सहसंस्थापक मोहित गुप्ता यांनी आपलं पद सोडलं. गेल्या काही दिवसांत झोमॅटोच्या व्यवस्थापनातील हा तिसरा राजीनामा होता. त्याच आठवड्यात, कंपनीचे न्यू एनिशिएटिव्ह हेड राहुल गंजू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याशिवाय इंटरसिटी लिजेंड सर्व्हिसेसचे प्रमुख सिद्धार्थ झंवर यांनी आठवड्यापूर्वी कंपनी सोडली. फूड-ऑर्डरिंग अॅप झोमॅटोनं नियमित कामगिरीवर आधारित कर्मचारी कपातीचा भाग म्हणून आपल्या कर्मचार्‍यांपैकी 3 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे, असं कंपनीच्या प्रवक्त्यानं सांगितलं. खराब कामगिरी करणार्‍यांना त्यांच्या गमवाव्या लागू शकतात नोकऱ्या - Zomato चे संस्थापक आणि CEO दीपेंद्र गोयल यांनी अलीकडेच सूचित केलं होतं की कंपनीच्या सेगमेंटमध्ये नोकऱ्या काढून टाकल्या जाऊ शकतात ज्यांची कामगिरी चांगली नाही. वास्तविक Zomato आजकाल अनेक मोठ्या बदलांमधून जात आहे. अलीकडेच कंपनीनं घोषणा केली होती की यूएईमध्ये त्यांची डिलिव्हरी सेवा बंद केली जाईल. तिथे राहणाऱ्या लोकांचे ऑर्डर दुसऱ्या अॅपवर ट्रान्सफर केले जातील, असं सांगण्यात आलं. हेही वाचा:  Financial planning: ‘या’ मोठ्या आर्थिक चुका टाळा, नाहीतर आयुष्यातून उठलाच म्हणून समजा  सहसंस्थापकही राजीनामा देणार - झोमॅटोचे सहसंस्थापक मोहित गुप्ता यांनी काल राजीनामा जाहीर केला आहे. Zomato ने गेल्या गुरुवारी दुसऱ्या तिमाहीत कमी नुकसान झाल्याचं सांगितलं. ऑनलाइन ऑर्डरमध्ये सतत वाढ झाल्यामुळं ही मदत झाली. कंपनीनं नियामक फाइलिंगमध्ये म्हटलं आहे की 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या तीन महिन्यांसाठी एकत्रित निव्वळ तोटा 2.51 अब्ज रुपये होता, जो एका वर्षापूर्वी हा तोटा 4.30 अब्ज होता. त्याच वेळी ऑपरेशन्समधील महसूल 10.24 अब्ज रुपयांवरून 16.61 अब्ज रुपयांपर्यंत वाढला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

 मंदीमुळे कर्मचारी कपात- जागतिक मंदीमुळे आयटीसह इतर क्षेत्रात कर्मचारी कपात होत आहे. यापूर्वी फेसबुकची मूळ कंपनी मेटानं 11000हून अधिक कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्याची चर्चा केली होती. याशिवाय अॅमेझॉन, ट्विटर आणि मायक्रोसॉफ्टसह अनेक कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. भारतातील Byju’s आणि Unacademy सारख्या स्टार्टअप्सनीही कर्मचारी कपात जाहीर केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Zomato
  • First Published :
जाहिरात
जाहिरात