नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर : कोरोनाकाळात सगळ्यांचेच पैसे कमवायचं साधन बंद झाले होते. जेव्हा सगळीकडे कामधंदे बंद होते, त्यावेळी पोस्ट ऑफिसने मात्र गेल्या सहा महिन्यांत करोडोंचा नफा कमावला आहे. ज्यावेळी सामानाची ने-आण करणाऱ्या मोठमोठ्या गाड्या बंद होत्या, तेव्हा पोस्ट ऑफिसची लाल गाडी आंबा, संत्री, लिची आणि कॉफी यांसारख्या महत्त्वाच्या वस्तू देशातील 75 शहरांमध्ये पोहचवत होती.
पोस्टऑफिसच्यागाड्यांचा25000किमीप्रवास...
लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री संजय धोत्रे म्हणाले, “कोरोना आणि लॉकडाउन दरम्यान पोस्ट ऑफिसला आवश्यक वस्तू पुरवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. हे लक्षात घेता, पोस्ट ऑफिसने 24 एप्रिलपासून देशातील 75 मह्त्त्वाच्या शहरांना जोडणार्या 56 राष्ट्रीय महामार्गांवर एक नेटवर्क तयार केलं. या योजनेत राज्यांचे 266 मुख्य मार्गही समाविष्ट करण्यात आले. या नेटवर्कवर, पोस्ट ऑफिसच्या वाहनांनी सुमारे 25,000 किमी प्रवास केला.”
20 हजारपोत्यांतून 93 टनमालाचापुरवठा...
वस्तूंचा पुरवठा करण्याची स्वतःची एक पद्धत असते. पोहचवण्यात येणाऱ्या वस्तू पोस्ट ऑफिसच्या 20 बॅगांमध्ये भरल्या गेल्या होत्या. हा रोजचा नियम होता. अशा पद्धतीने एका दिवसात 93 टन माल वाहून नेला जात होता. या दृष्टीने, लॉकडाउन दरम्यान पोस्ट ऑफिसने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी 3500 टन माल वेगवेगळ्या शहरांत पुरवला.
लोकांच्याघरी, शेतात, दुकानातपोस्टऑफिसनेमालपोहचवला...
आंबा, संत्री, लिची यांसारखी हंगामी फळं बागेतच खराब होऊ नयेत तसंच लॉकडाउनमध्येही लोकांनी या फळांचा आस्वाद घ्यावा, यासाठी पोस्ट ऑफिसने एक नेटवर्क तयार केलं होतं. कोको पावडर, जनावरांचा खाद्य/चारा, भाजीपाला, बियाणं, ठिबक सिंचन पाईप अशा प्रकारे शेतशी संबंधित प्रत्येक महत्त्वाची वस्तू शेतकऱ्यांच्या शेतात पोस्टाने पोहोचवली. पोस्ट ऑफिसने पत्र आणि पार्सल हे पोहचवण्याबरोबरीने या वस्तू वेगवगेळ्या शहरात पोहचवून ५ हजार कोटी रुपयांहून जास्त रक्कम कमावली आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.