या बँकेच्या 50 शाखा बंद होणार; खर्चात 20 टक्के कपात केली जाणार

या बँकेच्या 50 शाखा बंद होणार; खर्चात 20 टक्के कपात केली जाणार

कामकाज तर्कसंगत करण्याच्या हेतूने बँक 50 शाखा बंद करत आहे. शाखांसह एटीएमची संख्याही कमी होऊ शकत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 26 ऑक्टोबर : येस बँक (Yes Bank) त्यांच्या 50 शाखा बंद करणार आहे. नवीन व्यवस्थापनाखाली खासगी क्षेत्रातील या बँकने चालू आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये चालू खर्चात (Operational Expenses) 20 टक्के कपात करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.

येस बँकेचे नवे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक प्रशांत कुमार यांनी, बँक लीजवर न दिलेल्या जागा परत करत आहे. तसंच भाडेतत्वावर देण्यात आलेल्या जागांचे दर निश्चित करण्यावर चर्चा करत असल्याचं, सांगितलं.

अनेक मोठे डिफॉल्टर्स (Defaulters) कोटात जात असल्याने, मुंबईतील या बँकेला कर्ज वसुली करण्यात अडचणी येत आहेत. येस बँकेचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी राणा कपूर यांच्या कार्यकाळात, अनेक त्रुटी समोर आल्यानंतर भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्त्वात बँकेत भांडवल भरून या बँकेला वाचवण्यात आलं होतं. त्यानंतर मार्चमध्ये कुमार यांची बँकेचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये बँकेचा नफा 21 टक्क्यांनी घसरला. बँकेचे किमतीवर कोणतेही नियंत्रण नसल्याचं कुमार यांनी सांगितलं.

बँकेने मध्य मुंबईतील इंडियाबुल्स फायनान्स सेंटरमध्ये पहिले दोन मजले सोडले आहेत. त्याशिवाय बँक सर्व 1100 शाखांसाठी नव्या भाडेतत्वासाठी चर्चा करत आहे. या प्रक्रियेमुळे बँकेच्या भाडे खर्चात जवळपास 20 टक्के कमी येण्याची आशा असल्याचं, सांगण्यात आलं आहे. कामकाज तर्कसंगत करण्याच्या हेतूने बँक 50 शाखा बंद करत आहे. अनेक शाखा अतिशय जवळ-जवळ आहेत, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या ही बाब व्यवहारिक नसल्याचं कुमार यांनी सांगितलं. शाखांसह एटीएमची संख्याही कमी होऊ शकत असल्याचंही ते म्हणाले.

Published by: Karishma Bhurke
First published: October 26, 2020, 9:03 AM IST
Tags:

ताज्या बातम्या