
स्मार्ट गुंतवणूकदार असा असतो जो कमी धोका पत्करून जास्त पैसे मिळवतो. त्यासाठी पब्लिक प्राॅव्हिडंट फंड म्हणजे PPF हा उत्तम पर्याय आहे.

PPFमध्ये तुम्ही कधीही पैसे गुंतवू शकता. त्या गुंतवणुकीचा उपयोग टॅक्स वाचवण्यासाठी होतो. शिवाय मॅच्युरिटीनंतर मिळणाऱ्या पैशावरही टॅक्स नाही.

प्रत्येक व्यक्तीनं दर महिन्याला 12 हजार रुपये PPFमध्ये गुंतवले तर 15 वर्षांनी खात्यात 39,65,072 रुपये जमा होतील PPFवर 8 टक्के व्याज मिळू शकतं.

एक व्यक्ती PPFचं एकच खातं उघडू शकते. PPFमध्ये कमीत कमी 500 आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवता येतात.

तुम्ही तुमच्या लहान मुलांच्या नावेही PPF उघडू शकता. त्यासाठी कमीत कमी 100 रुपये भरले तरी चालू शकतात.




