Home /News /money /

घर घेण्याचं स्वप्न आहे? मग जाणून घ्या कोणत्या बँका देताहेत सर्वात कमी व्याजदरात Home Loan

घर घेण्याचं स्वप्न आहे? मग जाणून घ्या कोणत्या बँका देताहेत सर्वात कमी व्याजदरात Home Loan

बँकांकडून देण्यात येणारं होम लोन यासाठी खूप मदत करतं. जर तुम्ही एवढ्यात घर घेण्याचा विचार करत असाल तर वेगवेगळ्या बँकांकडून देण्यात येणारे होम लोन आणि त्यावर आकारल्या जाणाऱ्या व्याजाबद्दल जाणून घ्या.

नवी दिल्ली, 03 मार्च: आपलं स्वतःचं घर (Own Home) मालकीचं असावं, हे प्रत्येक मध्यमवर्गीय भारतीयाचं सर्वात मोठं स्वप्न असतं. घर घेतल्यानंतर तो कार आणि इतर गोष्टी खरेदी करण्याचा विचार करतो. तसं पाहिलं तर घर घेणं खूप जिकिरीचं काम आहे, कारण त्यासाठी खूप पैसा लागतो. पण बँकांकडून देण्यात येणारं होम लोन यासाठी खूप मदत करतं. जर तुम्ही एवढ्यात घर घेण्याचा विचार करत असाल तर वेगवेगळ्या बँकांकडून देण्यात येणारे होम लोन आणि त्यावर आकारल्या जाणाऱ्या व्याजाबद्दल जाणून घ्या. अशा अनेक बँका आहेत ज्या 6.4 ते 6.5% व्याजदराने होम लोन देतात. काही बँका अशाही आहेत, ज्यांचा व्याजदर यापेक्षा किंचित जास्त आहे. परंतु जर तुम्ही 6.4 आणि 6.5% चा फरक पाहिला तर 0.10% च्या फरकाने तुम्हाला होम लोनच्या पूर्ण पेमेंटवर (Full Payment of Home Loan) फायदा होताना दिसेल. सर्वात स्वस्त होम लोन (Cheapest Home Loan) म्हटलं की तुमच्या डोळ्यांसमोर स्टेट बँक ऑफ इंडिया (state bank of india), एचडीएफसी बँक (HDFC Bank) किंवा आयसीआयसीआय बँकेचे (ICICI Bank) नाव सर्वात आधी येण्याची शक्यता आहे. पण यापैकी कोणतीही बँक सर्वात स्वस्त होम लोन देत (Cheapest Home Loan) नाही. एक महत्वाची गोष्ट अशी की, लोन घेणाऱ्या व्यक्तीच्या सिबिल स्कोअरवर (CIBIL Score) त्याचा व्याजदर (Interest Rate) अवलंबून असतो. आता पाहूयात सर्वांत कमी व्याजदरावर होमलोन देणाऱ्या बँका (Low Interest Rate On Home Loan) कोणत्या आहेत ते. युनियन बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) 6.8 टक्के रेपो लिंक्ड लेंडिंग रेटने होम लोन देत आहे. बँक किमान 6.4 टक्के आणि कमाल 7.25 टक्के दराने होमलोन देत आहे. तुमची क्रेडिट हिस्ट्री (credit history) चांगली असल्यास, तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर सर्वांत कमी व्याजदरांत (lowest interest rate) खरेदी करू शकता. बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया 6.85 टक्के RLLR वर होमलोन देत आहे. बँक किमान 6.5 टक्के आणि कमाल 8.2 टक्के व्याजदराने कर्ज देत आहे. कोटक महिंद्रा बँक कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) ही बँक सर्वांत कमी दरात होम लोन देण्यासाठी प्रसिद्ध आहे. बँक सध्या 6.50 टक्के RLLR सह लोन देत आहे. ही खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक बँक आहे. बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) होम लोन देण्यापूर्वी तुमच्या संपूर्ण क्रेडिट इतिहासाची तपासणी करते. त्यानंतर पात्र कर्जदारांना कमी दराने कर्ज देते. ही बँक 6.5 टक्के आरएलएआर दराने गृहकर्ज देत आहे. ही बँक घर खरेदीसाठी किमान 6.5 टक्के आणि कमाल 7.85 टक्के व्याजदराने कर्ज देऊ करत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) ही बँक 6.8 टक्के RLLR सह होम लोन देत आहे. बँक त्यावर किमान 6.4 टक्के आणि कमाल 7.8 टक्के व्याज देत आहे. तुमचा CIBIL स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला सर्वांत कमी दरात होम लोन मिळेल.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Bank, Home Loan

पुढील बातम्या