जाहिरात
मराठी बातम्या / मनी / रिटायर्डमेंटनंतर कुठून येतील पैसे? LIC चा हा प्लॉन आताच करा चेक

रिटायर्डमेंटनंतर कुठून येतील पैसे? LIC चा हा प्लॉन आताच करा चेक

मनी

मनी

विमा क्षेत्रात भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया ही अतिशय विश्वासार्ह आणि सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत लोकप्रिय झालेली कंपनी आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर : विमा क्षेत्रात भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया ही अतिशय विश्वासार्ह आणि सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत लोकप्रिय झालेली कंपनी आहे. प्रत्येक वयोगटातील नागरिकासाठी एलआयसीकडून नानाविध योजना राबवल्या जातात. भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं या योजनांचा अतिशय चांगला फायदाही होतो. त्यामुळे ग्राहक एलआयसी कंपनीचा विमा खरेदी करायला प्राधान्य देतात. एलआयसीची जीवन विमा योजना तर आहेच, पण पेन्शनसंदर्भात विविध प्लॅनची मोठी यादी कंपनीकडे आहे. यात ‘सरल पेन्शन प्लॅन’चा उल्लेख करावा लागेल. कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता पुरवण्यासह पेन्शनसाठी हा प्लॅन अतिशय उपयुक्त असा मानला गेलाय. ‘टीव्ही नाईन हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलंय. एलआयसीच्या सरल प्लॅनमध्ये ग्राहकाला आपल्या हिशोबाने पेन्शन व प्रीमिअमची रक्कम निवडण्याचं स्वातंत्र्य मिळतं. 40 ते 80 वर्ष वयोगटातील नागरिक या प्लॅनची निवड करू शकतात. एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत केवळ एकदा प्रीमिअम भरून दर महिन्याला 12,000 रुपये पेन्शन मिळवू शकता. एखादा विमाधारक या योजनेअंतर्गत मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक पेन्शनचा पर्याय निवडू शकतो. या प्लॅनमध्ये विमाधारक व्यक्ती 60 वर्षांचा झाल्यानंतर पेन्शन सुरू होते. वर्षाला कमीतकमी 12,000 रुपये भरून एखादी व्यक्ती विमा खरेदी करते तेव्हा त्याला पेन्शन सुरू होते. प्लॅनमध्ये जास्तीतजास्त किती रक्कम जमा करावी याची काही मर्यादा नाही. एखादी व्यक्ती जर 10 लाख रुपयांचा सिंगल प्रीमिअम जमा करत असेल तर त्या व्यक्तीला दरवर्षी 52,500 रुपये पेन्शन मिळू शकतं. हेही वाचा -  नव्याने नोकरीला लागलेल्या तरुणांनी कशी करावी बचत? वापरा या सोप्या टिप्स एलआयसीच्या सरल पेन्शन प्लॅनला तुम्ही बँक खात्याशी जोडू शकता. यामुळे प्रीमिअम जमा करण्याचा ताण राहत नाही. दर महिन्याला सरल पेन्शन प्लॅनची रक्कम आपोआप कपात होत राहील. दर महिन्याला तुम्ही ज्या प्रीमिअमची निवड केली असेल त्याप्रमाणे पैसे खात्यातून वजा होतील. स्वत:सह पत्नीसाठीही हा प्लॅन निवडण्याची मुभा आहे. स्वत:ला प्लॅनमध्ये विमाधारकाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. परंतु, विमाधारकाच्या मृत्युनंतर नॉमिनीला प्रीमिअम देण्यात येतो. जॉइंट प्लॅन घेतला असल्यास पतीनंतर पत्नीला पेन्शन दिली जाते. असा खरेदी करता येईल विमा प्लॅन सरल पेन्शन प्लॅनसाठी विमाधारक व्यक्तीला रहिवासी पुराव्यासह इतर केवायसी कागदपत्रं व मेडिकल रेकॉर्डसह एक अर्ज भरावा लागतो. विम्याची रक्कम व व्यक्तीच्या वयाच्या आधारावर काही विशेष प्रकरणात मेडिकल रिपोर्टची गरज भासते. एखाद्या व्यक्तीला जर गंभीर आजार असेल आणि विमाधारकाला आणीबाणीच्या स्थितीत अधिक पैशांची गरज पडली तर ती व्यक्ती सरल पेन्शन प्लॅनमधील जमा केलेली रक्कम परत घेऊ शकते. प्लॅनमध्ये काही आजारांची यादी दिली गेलीय, त्यानुसार विमाधारक विमा सरेंडर करून पैसे परत घेऊ शकतो. सरल पेन्शन प्लॅन सुरू झाल्यानंतर 6 महिन्यांनी या योजनेवर कर्जही काढता येऊ शकते. कधीपासून सुरू झालाय हा प्लॅन सरकारी विमा नियामक संस्था इरडानं मागील वर्षी 1 एप्रिलपासून सर्व विमा कंपन्यांना सरल पेन्शन प्लॅन सुरू करण्यासाठी परवानगी दिलीय. जवळपास सर्वच कंपन्यांनी 1 एप्रिलपासून या पेन्शन प्लॅन सुरू केले आहेत. सरल पेन्शन प्लॅनमध्ये विमाधारकाला मॅच्युरिटीचा फायदा मिळत नाही. परंतु जितक्या रकमेचा विमा काढला जातो ती रक्कम परत मिळते. याशिवाय आयुष्यभर विमाधारकाला पेन्शनही मिळते. कंपनीच्या हिशोबाने सरल पेन्शन प्लॅनचा दर ठरवला जातो. परंतु या योजनेचे नाव सरल पेन्शन योजना ठेवणं बंधनकारक आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात