नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : सध्या जगाची अर्थव्यवस्था मंदीच्या छायेत आहे. भारतावर मंदीचा परिणाम होणार नसल्याचे अर्थतज्ज्ञ सांगत आहेत. मात्र, जगभरात याचे परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. ब्युटी प्रोडक्ट्स आपल्याला अर्थव्यवस्थेतील घसरणीचे किंवा सुधारणेचे खरे चित्र दाखवतात असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्हालाही धक्का बसेल. मात्र, अनेक वर्षांच्या विश्लेषणानंतर, अर्थशास्त्रज्ञांनी सौंदर्य उत्पादनांची विक्री अर्थव्यवस्थेच्या वास्तविक चित्राचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वात योग्य असल्याचे सांगितले आहे. लिपस्टिक इंडेक्सबद्दल तुम्ही आधी ऐकले असेल किंवा फाउंडेशन इंडेक्सच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचे चित्र सांगणाऱ्या बातम्या वाचल्या असतील. या दिशेने एक नवीन टर्म परफ्यूम इंडेक्स आहे, जी मंदी आणि दबाव असूनही ग्राहक आपला मूड सुधारण्यासाठी कुठे पैसे खर्च करत आहेत आणि या उत्पादनांच्या विक्रीचा उपयोग खऱ्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी कसा केला जाऊ शकतो हे सांगते. 21 वर्षांपूर्वी आला होता लिपस्टिक इंडेक्स एस्टी लॉडर कंपनीचे अध्यक्ष लिओनार्ड लॉडर यांनी 2001 च्या मंदीच्या काळात लिपस्टिक इंडेक्स हा शब्द वापरला. अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता असूनही, त्या वर्षीच्या हिवाळ्यात लिपस्टिकच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे त्यांना आढळले. यावरून लॉडरने असा निष्कर्ष काढला की, अर्थव्यवस्थेतील मंदी आणि मंदीच्या काळात, जेव्हा महिला जास्त पैसे खर्च करू शकत नाहीत, तेव्हा त्यांना लिपस्टिकसारखी स्वस्त उत्पादने खरेदी करून त्यांचा मूड सांभाळण्याचा प्रयत्न करतात. याचा त्यांच्या आर्थिक आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही. वाचा - पुण्यातील रुपी बँकेला 22 सप्टेंबरला लागणार कायमचा टाळा! ग्राहकांचे पैसे मिळणार का? मग फाऊंडेशन इंडेक्स आला 2008-09 च्या आर्थिक मंदीच्या काळात फाऊंडेशन इंडेक्स समोर आला. जेव्हा महिलांनी सौंदर्य उत्पादनांवर जास्त पैसा खर्च करण्याऐवजी फाऊंडेशनच्या माध्यमातून त्वचेला चमकदार करण्याचे रहस्य शोधून काढले. यादरम्यान असे दिसून आले की, मंदी असतानाही बाजारात फाऊंडेशनची विक्री जोरात होती आणि महिला इतर छंदांवर जास्त पैसा खर्च करू शकत नसताना त्यांनी फाऊंडेशनचा वापर करून स्वत:ला सुंदर दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. आता परफ्यूम इंडेक्स कोविड-19 महामारीनंतर अर्थतज्ज्ञांनी परफ्यूम इंडेक्सची नवीन टर्म आणली आहे. साथीच्या रोगानंतर, परफ्यूम किंवा केसांच्या सौंदर्य उत्पादनांची विक्री इतर अनावश्यक वस्तूंच्या तुलनेत वेगाने वाढली आहे. हे ग्राहकांच्या वर्तनाचे अधिक जवळून स्पष्टीकरण देतात. सध्या मेकअप उत्पादनांची विक्री वाढत आहे. अमेरिका आणि युरोपसह इतर प्रिमियम मार्केटमध्ये लिपस्टिकची विक्री झपाट्याने वाढू लागली आहे. कोटी इंकचे सीईओ नबी म्हणतात की आम्ही याला फ्रेग्रेंस इंडेक्स किंवा सुगंध प्रभाव म्हणतो. लॉकडाऊन आणि साथीच्या काळात, त्यांच्या घरात कैद असलेल्या लोकांनी त्यांचा मूड सुधारण्यासाठी सेंट आणि परफ्यूम खरेदी केले. युरोपीय बाजारपेठांमध्ये या वर्षीही जानेवारी-जुलैमध्ये परफ्यूमच्या विक्रीत 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाचा - Loan on PPF: पीपएफ खात्यावर सहज मिळवा स्वस्त लोन, कर्ज घेताना या गोष्टी लक्षात ठेवा हेअर कलर देतात संकेत केसांची निगा राखणाऱ्या उत्पादनांच्या विक्रीवरही अशीच काही चिन्हे दिसत आहेत. यावेळी आर्थिक अस्थिरतेनंतर, लॉरियलसह केसांच्या रंगाच्या इतर प्रीमियम ब्रँडच्या विक्रीतही झपाट्याने वाढ झाली आहे. अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, साथीच्या आजारानंतर महिलांनी सलूनमध्ये जाण्याऐवजी केसांना रंग देऊन स्वत:ला चांगले दिसण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे बाजारात अशा उत्पादनांची मागणी वाढली आहे. याशिवाय केसांच्या तेलासारख्या उत्पादनांची विक्रीही आता वाढत आहे. एकूणच, हे परिणाम दर्शवतात की जेव्हा लोकांकडे खर्च करण्यासाठी जास्त पैसे नसतात तेव्हा ते अशा उत्पादनांचा वापर करतात, ज्यामुळे त्यांच्या खिशावर जास्त भार न पडता त्यांचा मूड सुधारू शकतो. या टर्म उत्पादनांच्या विक्रीनुसार तयार केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.