जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कस्टम ड्युटी म्हणजे काय? ती ऑनलाइन कशी भरायची?

कस्टम ड्युटी म्हणजे काय? ती ऑनलाइन कशी भरायची?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

काय आहे कस्टम ड्यूटी आणि ती कशी भरली जाते जाणून घ्या याबाबत स्टेपबाय स्टेप

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 18 ऑगस्ट : तुम्ही नेहमीच लोकांना असं बोलताना पाहिलं असणार की कस्टम ड्यूटी लागली, पैसे जास्त गेले, वैगरे-वैगरे. पण ही कस्टम ड्यूटी म्हणजे नक्की काय? असा प्रश्न अनेकांनाटच पडला आहे. तसेच याचे फायदे-तोटे याबद्दल देखील लोकांना अनेक प्रश्न असतात. परदेशातून कोणतीही वस्तू आयात केली जाते, तेव्हा त्या देशाचे सरकार त्या वस्तूवर टॅक्स आकारते, त्याला कस्टम ड्युटी म्हणतात. हा कर सरकारकडून वस्तूंच्या निर्यात आणि आयातीवर लावला जातो. कस्टम ड्युटीचे फायदे - हे देशाची आर्थिक स्थिरता, नोकऱ्या, पर्यावरण इत्यादी सुनिश्चित करते. - हे देशातील आणि देशाबाहेर मालाच्या हालचालींवर लक्ष ठेवते. - ही यंत्रणा प्रतिबंधित वस्तूंवर लक्ष ठेवते. कस्टम ड्युटीची श्रेणी - जगातील प्रत्येक देश त्या देशात आयात किंवा निर्यात केलेल्या वस्तूंवर सीमाशुल्क लावतो. सीमाशुल्काचं वर्गीकरण - बेसिक कस्टम ड्युटी (Basic Customs Duty (BCD)) - अतिरिक्त सीमा शुल्क किंवा विशेष सीव्हीडी (Additional Customs Duty) - सुरक्षात्मक ड्युटी (Protective Duty) - काउंटरवेलिंग ड्युटी (Countervailing Duty) - अँटिडंपिंग ड्युटी(Anti-dumping Duty) - कस्टम ड्युटीवरील शिक्षण उपकर (Education Cess on Custom Duty) कस्टम ड्युटीची गणना कशी केली जाते? कस्टम ड्युटीच्या मुल्याची गणना वस्तूचं मूल्य किंवा विशिष्ट आधारावर केली जाते. कस्टम ड्युटीचं मूल्य वस्तूंच्या मूल्यावर अवलंबून असतं. कस्टम ड्युटी व्हॅल्यूएशन (आयात केलेल्या वस्तूंच्या मूल्याचे निर्धारण) नियम, 2007 नुसार या वस्तूंचं मूल्य निश्चित करण्यात आलं आहे. तुलनात्मक मूल्य पद्धत: नियम 4 आणि 5 नुसार, सारख्या किंवा समान वस्तूच्या आयात-निर्यातीच्या मूल्याशी तुलना केली जाते. डिडक्टिव्ह व्हॅल्यु मेथड: नियम 7 नुसार, या पद्धतीत ज्या देशातून आयात केली जाते, त्या देशातील वस्तूंचे विक्री मूल्य विचारात घेतले जाते. गणना मूल्य पद्धत: नियम 8 नुसार, उत्पादक देशामध्ये निर्मिती, साहित्य आणि नफा संबंधित खर्च मोजले जातात. फॉलबॅक पद्धत: नियम 9 नुसार, ही पद्धत थोडीशी लवचिक आहे, कारण त्याची गणना मागील सर्व पद्धतींवर आधारित आहे. कस्टम ड्युटी ऑनलाइन कशी भरायची? 1: CEGATE उघडा आणि ई-पेमेंट पोर्टलवर लॉग इन करा. 2 : ICEGATE ने दिलेल्या क्रेडेन्शियल्ससह लॉग इन करा किंवा तुमचा साधा आयात किंवा निर्यात कोड भरा. 3: तुम्हाला ई-पेमेंट बटण दिसेल, त्यावर क्लिक करा. 4: आता तुमच्या नावाखाली दिलेली सर्व ई-चलनं तपासा. 5: तुम्हाला भरायचं असलेलं चलन निवडा. 6 : पेमेंट मोड निवडा, त्यानंतर तुम्हाला पेमेंट गेटवेवर पाठवलं जाईल. 7 : पेमेंट केल्यानंतर तुम्हाला परत ICEGATE पोर्टलवर आणलं जाईल. 8 : आता प्रिंट बटणावर क्लिक करा आणि तुमच्या पेमेंटची कॉपी तुमच्याकडे ठेवा. अशा रितीने तुम्ही कस्टम ड्युटी ऑनलाइन भरू शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात