जाहिरात
मराठी बातम्या / मनी / business idea : वेडिंग प्लॅनिंगसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या, कसा सुरू करायचा व्यवसाय?

business idea : वेडिंग प्लॅनिंगसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या, कसा सुरू करायचा व्यवसाय?

business idea : वेडिंग प्लॅनिंगसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या, कसा सुरू करायचा व्यवसाय?

लग्न एकदाच होतं त्यामुळे ते ग्रॅण्ड असायला हवं असं स्वप्न असतं. त्यामुळे ते बऱ्याचदा वेडिंग प्लॅनरकडे दिलं जातं. त्याला पैसे दिले की सगळं काही तो मॅनेज करतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : व्यवसाय कोणता करायचा असा प्रश्न असेल तर टेन्शन घेऊ नका. सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्याशी संबंधित कोणते व्यवसाय करू शकता याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. लग्न एकदाच होतं त्यामुळे ते ग्रॅण्ड असायला हवं असं स्वप्न असतं. त्यामुळे ते बऱ्याचदा वेडिंग प्लॅनरकडे दिलं जातं. त्याला पैसे दिले की सगळं काही तो मॅनेज करतो. पूर्वी या सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी घरातील लोकांवर होती, मात्र बदलत्या काळात आता हे काम वेडिंग प्लॅनर्सच्या जबाबदारीवर येऊन ठेपले आहे. धावपळीच्या या जीवनात अनेक वेळा लग्न समारंभातील छोट्या-छोट्या गोष्टी सांभाळायला घरातल्या लोकांना वेळ मिळत नाही आणि वेडिंग प्लॅन करणारे ही गरज पूर्ण करतात. याच कारणामुळे हल्ली हा व्यवसायही खूप वाढत चालला आहे. लग्नाशी संबंधित तयारी, नियोजन आणि व्यवस्थापनाची कामं वेडिंग प्लॅनर जबाबदारीनं पार पाडत असतो. केटरर्सची व्यवस्था, पाहुण्यांसाठी हॉटेल बुकिंग, वाहनांची व्यवस्था, लाइटिंग, डीजे, डेकोरेशन अशी सर्व प्रकारची कामे वेडिंग प्लॅनर्स करतात. आपल्या क्लायंटच्या गरजा आणि बजेटनुसार एक चांगला विवाह सोहळा पूर्ण निर्विघ्नपणे पार पाडणं हा वेडिंग प्लॅनरचा हेतू असतो. वेडिंग प्लॅनर कोणती कोणती सेवा देतो डेकोरेशन कॅटरिंगची संपूर्ण जबाबदारी निमंत्रण पत्रिका समारंभानुसार वधू-वरांना पोशाख निवडण्यास मदत करणे स्वागत समारंभ, हळदी, मेहंदी आदी लग्नाशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करणे. लाईट/ डीजे दुर्लक्ष केले जाऊ शकते अशा कोणत्याही गोष्टींसाठी मदत करणं ठिकाण निवडण्यापासून ते सगळं निश्चित करण्यापर्यंत, अगदी पाहुण्यांची व्यवस्था हे देखील त्यांचंच काम असतं लग्नाची पार्टी योग्य वेळी योग्य ठिकाणी आहे याची खात्री करणे

News18लोकमत
News18लोकमत

सध्या याबाबतचे काही कोर्स देखील उपलब्ध आहेत. पण प्रत्यक्षात यासाठी कोणत्याही कोर्सची आवश्यकता नसते. ज्याच्याकडे उत्तम नियोजन आहे तो हा व्यवसाय करू शकतो. योग्य वेळ गाठणं आणि उत्तम नियोजन करण्याचं हे कौशल्य आहे. मार्केटिंगचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याच सोबत हजरजबाबीपणा आणि प्रत्येक गोष्टीत स्वत:ला अपडेट ठेवणंही गरजेचं आहे. पैसा उभा करण्यापासून ते त्याचं योग्य नियोजन आणि याशिवाय सगळं मॅनेज करून त्यातून नफाही काढता आला पाहिजे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात