मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Vyapar Credit Card: मोदी सरकारची नवी योजना, छोट्या व्यापाऱ्यांना मिळणार क्रेडिट कार्ड, 'हे' आहेत फायदे

Vyapar Credit Card: मोदी सरकारची नवी योजना, छोट्या व्यापाऱ्यांना मिळणार क्रेडिट कार्ड, 'हे' आहेत फायदे

Vyapar Credit Card: मोदी सरकारची नवी योजना, छोट्या व्यापाऱ्यांना मिळणार क्रेडिट कार्ड, हे आहेत फायदे

Vyapar Credit Card: मोदी सरकारची नवी योजना, छोट्या व्यापाऱ्यांना मिळणार क्रेडिट कार्ड, हे आहेत फायदे

Vyapar Credit Card: संसदीय समितीनं केवळ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या पोर्टलवर नोंदणीकृत उद्योजकांना व्यवसाय क्रेडिट कार्ड देण्याची शिफारस केली आहे. या कार्डमुळे छोट्या व्यावसायिकांना कमी व्याजदरात एक लाख रुपयांचे कर्ज सहज मिळेल.

पुढे वाचा ...
    मुंबई, 30 जुलै: देशात व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेणं सोपं होणार आहे. किसान क्रेडिट कार्ड (KCC) प्रमाणंच व्यवसाय क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या योजनेवर केंद्र सरकार काम करत आहे. बिझनेस क्रेडिट कार्डमुळे (Business Credit Card), व्यावसायिकांना काहीही तारण न ठेवता स्वस्त दरात कर्ज सहज मिळेल. सरकार लवकरच ते राष्ट्रीय स्तरावर सुरू करू शकतं. स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाला (SIDB) तिच्या नोडल एजन्सीची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तुम्हाला किती कर्ज मिळेल- संसदीय स्थायी समितीने अर्थ मंत्रालय आणि विविध बँकांशी बिझनेस क्रेडिट कार्ड्सबाबत चर्चा केली आहे. या कार्डची मर्यादा 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत असू शकते. म्हणजे छोट्या व्यावसायिकांना कमी व्याजदरात एक लाख रुपयांचं कर्ज सहज मिळेल. समितीने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या (MSME) पोर्टलवर नोंदणीकृत उद्योजकांनाच व्यवसाय क्रेडिट कार्ड देण्याची शिफारस केली आहे. अजूनही लाखो उद्योग या पोर्टलवर नोंदणीकृत नाहीत. बिझनेस कार्ड मिळविण्यासाठी मंत्रालयाच्या एंटरप्राइज पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. हेही वाचा- Parle ठरला देशातला सर्वांत मोठा FMGC ब्रँड; सलग 10 वर्ष पहिल्या स्थानावर लवकरच मिळू शकतो ग्रीन सिग्नल- व्यापारी क्रेडिट कार्ड सुरू केल्यानंतर किराणा दुकान चालवणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना मदत मिळणार आहे. कोरोना महामारीच्या काळात फक्त लघू आणि मध्यम उद्योगांना सर्वाधिक फटका बसला. यामुळे, आता सरकार व्यवसाय क्रेडिट कार्ड सुरू करून अशा उद्योगांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. संसदेच्या स्थायी समितीने यासाठी शिफारस केली आहे. वृत्तानुसार, सरकारने हा प्रस्ताव स्वीकारला असून आता लवकरच या योजनेला ग्रीन सिग्नल मिळू शकतो. कर्जाची रक्कम बँक ठरवणार- अहवालानुसार, देशात एकूण 6.30 कोटी लघु उद्योग आणि 3.31 लाख लघु उद्योग आहेत. व्यापारी किंवा उद्योजकाला किती कर्ज द्यायचे, हे या बँका ठरवतील, अशी शिफारस समितीनं केली आहे. यासोबतच ते म्हणतात की, लॉयल्टी पॉइंट्स, रिवॉर्ड्स, कॅशबॅक आणि इतर फायदेही क्रेडिट कार्डद्वारे व्यापाऱ्यांना मिळायला हवेत. व्यवसाय क्रेडिट कार्ड एमएसएमईसाठी उपलब्ध असलेल्या सर्व क्रेडिट योजना एकत्र करेल.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Business, Credit card, Loan

    पुढील बातम्या