जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Fact Check: नोकरी करणाऱ्यांना मिळणार 1,55,000 रुपये? केंद्रीय कामगार मंत्रालयाने सांगितलं...

Fact Check: नोकरी करणाऱ्यांना मिळणार 1,55,000 रुपये? केंद्रीय कामगार मंत्रालयाने सांगितलं...

Fact Check: नोकरी करणाऱ्यांना मिळणार 1,55,000 रुपये? केंद्रीय कामगार मंत्रालयाने सांगितलं...

सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे ज्यात दावा करण्यात आला आहे की 1990-2021 दरम्यान काम करणाऱ्या कामगारांना कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून 1,55,000 रुपयांचा लाभ दिला जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 जून : नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. कामगार मंत्रालय (Ministry of Labour and Employment) नोकरी करणाऱ्यांना 1,55,000 रुपयांचा लाभ देत आहे का? सध्या सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. नुकतीच एक पोस्ट समोर आली आहे, ज्यामध्ये कामगार मंत्रालय नोकरी करणाऱ्यांना लाखो रुपयांचा लाभ देत असल्याचा दावा केला जात आहे. एबीपी न्यूजने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. व्हायरल पोस्टची फॅक्ट चेक व्हायरल पोस्ट पाहिल्यानंतर पीआयबीने त्याची सत्यता तपासली, ज्याद्वारे या व्हायरल पोस्टचे सत्य समोर आले आहे. पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) आपल्या अधिकृत ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. पीआयबीने ट्वीट म्हटलं… पीआयबीने एका ट्वीटमध्ये लिहिले आहे की, सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे ज्यात दावा करण्यात आला आहे की 1990-2021 दरम्यान काम करणाऱ्या कामगारांना कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून 1,55,000 रुपयांचा लाभ दिला जात आहे. LIC शेअर होल्डर्सना Paytm ची आठवण; महिनाभरात एक लाख कोटींहून अधिक नुकसान

जाहिरात

पीआयबीने सांगितले की, हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. असा कोणताही मेसेज मंत्रालयाने जारी केलेला नाही. असे खोटे व्हिडीओ कोणाशीही शेअर करू नका. तथ्य तपासणीनंतर पीआयबीने हा मेसेज पूर्णपणे बनावट असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा मेसेजपासून प्रत्येकाने सावध राहावे, असे पीआयबीने म्हटले आहे. PIB ने लोकांना असे मेसेज फॉरवर्ड न करण्यास सांगितले आहे. अशा मेसेजद्वारे दिशाभूल करून, तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती आणि पैसा धोक्यात आणता. नोटांवरील महात्मा गांधी यांचा फोटो बदलण्याच्या बातम्यांवर RBI ची महत्वाची माहिती कोणीही फॅक्ट चेक करु शकतो असा कोणताही मेसेज तुमच्यापर्यंत आल्यास, तुम्ही त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी फॅक्ट चेक करू शकता. तुम्ही PIB द्वारे तथ्य तपासणी करू शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल. याशिवाय, तुम्ही व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com वर व्हिडिओ पाठवू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात