मुंबई, 19 जुलै: दुचाकी तसेच चारचाकी वाहनांसाठी वाहन विमा आवश्यक (Benefits of Vehicle Insurance) मानला जातो, कारण तुमच्या वाहनाला अपघात झाल्यास, वाहन विमा संरक्षण नसल्यास संपूर्ण वाहनाचा खर्च तुम्हालाच करावा लागतो. त्याच वेळी, नवीन मोटार वाहन कायद्यानुसार (New Motor vehicle Act) , वाहनाचा विमा उतरवणं आवश्यक आहे. विना इन्शुरन्स भारतीय रस्त्यावर वाहन चालविल्यास दोन हजार रुपये दंड किंवा तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. सर्व वाहनांसाठी विविध प्रकारचा मोटार विमा दिला जातो. दुचाकी मोटार विम्यासाठी वेगळे नियम आहेत, तर चारचाकी मोटार विम्यासाठी वेगळे नियम आहेत. मोटार विम्याचे दोन प्रकार आहेत, पहिला थर्ड पार्टी विमा. यामध्ये ऑटोमोबाईल इन्शुरन्समध्ये थर्ड-पार्टी दायित्वांचा समावेश होतो. तुमच्या विमा उतरवलेल्या वाहनामुळे एखाद्याच्या वाहनाचं किंवा त्यांच्या मालमत्तेचं अनावधानानं झालेलं कोणतंही नुकसान थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये समाविष्ट केलं जाऊ शकतं. दुसरीकडे, सर्वसमावेशक मोटार विम्याअंतर्गत, अपघातामुळे चालक, मालक आणि प्रवाशांच्या मृत्यू किंवा अपंगत्वावर विमा लाभ उपलब्ध आहेत. मोटार वाहन विम्याचे फायदे- अपघात, दंगल, चोरी, दहशतवाद, नैसर्गिक आपत्ती आणि आग, स्फोट, पूर, वादळ, भूकंप इत्यादी आपत्तींमुळे वाहनाचे नुकसान झाल्यास भरपाई दिली जाते. यात तृतीय पक्षाच्या कायदेशीर दायित्वाच्या अंतर्गत मालमत्तेला झालेल्या कोणत्याही हानीसह, अपघाती मृत्यू आणि एखाद्या व्यक्तीला झालेली इजा देखील समाविष्ट केली जाईल. तर, वैयक्तिक अपघात संरक्षणाअंतर्गत, विमा कंपनी ड्रायव्हरला दुखापत झाल्यास वैद्यकीय उपचाराचा संपूर्ण खर्च उचलते. हेही वाचा: Electricity bill: वीजबिल येईल 3 हजार रुपयांनी कमी! ताबडतोब घरातून काढा ‘हे’ डिव्हाइस मोटर विमा खरेदीसाठी कागदपत्रे- मोटार विमा संरक्षण घेण्यासाठी, लोकांकडे पासपोर्ट आकाराचा फोटो, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड, रहिवासी पुरावा आणि कार आरसी असणे आवश्यक आहे. तुम्ही विम्यावर किती बचत करू शकता? भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानं विमा कंपन्यांना पे-एज-यू-ड्राइव्ह मोटर विमा पॉलिसी सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळं विमा खरेदीदारांना त्यांच्या कारसाठी सरासरी मर्यादा सेट करण्यास आणि सामान्य प्रीमियमवर सूट देण्यात देते. विमा कंपनी 7,500 किमी, 5,000 किमी आणि 2,500 किमीचे तीन स्लॅब ऑफर करते. ज्यांच्या वाहनाचा वापर कमी आहे अशा ग्राहकांना याचा फायदा होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.