मराठी बातम्या /बातम्या /मनी /फेरीवाल्यावर 366 कोटींचा GST थकवल्याचा आरोप; व्यावसायिक म्हणतो,मी दिवसाला...

फेरीवाल्यावर 366 कोटींचा GST थकवल्याचा आरोप; व्यावसायिक म्हणतो,मी दिवसाला...

GST

GST

कपडे विक्री करण्यासाठी मी दुसऱ्या शहरात गेलो होतो. तिथून परत आलो तर घरी रात्री जीएसटीचे अधिकारी पोहोचले होते असं व्यावसायिकाने म्हटलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

लखनऊ, 28 जानेवारी : रस्त्यावर कपडे विकणाऱ्या एका व्यक्तीला जीएसटी विभागाकडून थोडा थोडका नव्हे तर तब्बल 366 कोटींचा कर भरण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये राहणाऱ्या एजाज अहमद यांना ही नोटीस आल्यानंतर धक्काच बसला. दिवसाला जास्तीजास्त 500 रुपये कमाई असलेल्या एजाज हे जीएसटी विभागाच्या या नोटीसीमुळे आता चक्रावले आहेत.

एजाज अहमद यांचा भंगार व्यवसाय होता. जीएसटी अधिकाऱ्यांनी छाप्यानंतर त्यांना ३६६ कोटी रुपयांचा कर भरण्यास सांगितलं आहे. तर फर्मचे मालक असलेल्या एजाज यांचे म्हणणे आहे की ही कंपनी दोन वर्षांपूर्वीच बंद केली होती. आता या कंपनीचे त्यांच्याकडे 366 कोटी रुपये मागितले जात आहेत.

हेही वाचा : आनंद पोटात माझ्या.. अर्थसंकल्पात 8वा वेतन आयोग येणार?; सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार..

एजाज यांनी म्हटलं की, काही वर्षांपूर्वी आझाद एंटरप्रायजेस नावाने एक भंगाराचा व्यवसाय सुरू केला होता. गावीच हा व्यवसाय सुरू केल्यानंतर दरदिवशी 500 ते 1000 रुपयांपर्यंत भंगार खरेदी करून ते पुढे पाठवले जात होते. भंगाराच्या कामातून म्हणावं तितकं उत्पन्न मिळत नव्हतं. त्यामुळे हे काम बंद करावं लागलं आणि कपड्यांच्या विक्रीचा व्यवसाय सुरू केला. कपडे विक्री करण्यासाठी मी दुसऱ्या शहरात गेलो होतो. तिथून परत आलो तर घरी रात्री जीएसटीचे अधिकारी पोहोचले होते असंही एजाज यांनी म्हटलं.

जीएसटीच्या अधिकाऱ्यांची फौजच घरी दाखल झाली होती. त्यांनी मला सांगितलं की दोन वर्षांपूर्वी बंद झालेल्या कंपनीवर ३६६ कोटी रुपयांची जीएसटीची थकबाकी असून ती देय आहे असंही एजाज म्हणाले. आता या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी एजाज यांनी केलीय. या प्रकरणी जीएसटी सहायक आय़ुक्त जेएस शुक्ला यांनी विभागीय अधिकारी चौकशी करत असल्याचं सांगितलंय.

First published:

Tags: GST