मराठी बातम्या /बातम्या /मनी /सुट्टीमध्ये ट्रिपला जाण्याचा विचार करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायद्याची!

सुट्टीमध्ये ट्रिपला जाण्याचा विचार करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायद्याची!

ट्रॅव्हलिंग टिप्स

ट्रॅव्हलिंग टिप्स

अनेकदा बजेटमध्ये ट्रिप न झाल्यामुळे पश्चाताप करण्याची वेळ येते. तुमच्याही बाबतीत कधीतरी असं घडलं असेल. पण आता काळजी करू नका. कारण तुम्ही जेव्हा ट्रिपला जाल, तेव्हा तुम्हाला अधिकाधिक आनंद मिळावा, यासाठी आम्ही आज काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहोत.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 30 जानेवारी : रोजच्या त्याच त्याच धावपळीचा, कामाचा अनेकांना कंटाळा येतो. तेच काम, तिच ती माणसं यामुळे खूप वैतागायला होतं. मग रोजच्या कामात बदल म्हणून सुट्टी घेतली जाते. या सुट्टीत काय करायचं, याचं प्रत्येकाचं वेगवेगळं नियोजन असतं. अनेकजण सुट्टीचा जराही वेळ वाया न घालवता लगेचच ट्रिपसाठी बाहेर पडतात. पण अनेकदा बजेटमध्ये ट्रिप न झाल्यामुळे पश्चाताप करण्याची वेळ येते. तुमच्याही बाबतीत कधीतरी असं घडलं असेल. पण आता काळजी करू नका. कारण तुम्ही जेव्हा ट्रिपला जाल, तेव्हा तुम्हाला अधिकाधिक आनंद मिळावा, यासाठी आम्ही आज काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहोत. जेणेकरून तुमची आर्थिक बचतही होईल, व कमी बजेटमध्ये चांगली ट्रिपही होईल. ‘एनडीटीव्ही इंडिया’ ने याबाबत वृत्त दिलंय.

    अनेकांना फिरायला जाणं आवडतं. काहींना तर इतकं आवडतं की अनेक वेळा ते विचार न करता एखाद्या पर्यटनस्थळी फिरायला निघून जातात. पण अशा वेळी बजेटपेक्षा कितीतरी पट जास्त पैसा खर्च होतो, आणि फिरण्याची मजाच निघून जाते. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्याशी आज अशा ट्रॅव्हल टिप्स शेअर करत आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही बजेट फ्रेंडली ट्रिप करून फिरण्याचा खूप आनंद घेऊ शकता. चला तर या टिप्स काय आहेत, ते जाणून घेऊया.

    हेही वाचा - यंदाच्या बजेटमध्ये 'या' सात गोष्टींवर सूट मिळाल्यास होईल सर्वसामान्यांचा फायदा

    ऑफ सीझनला प्राधान्य

    जर तुम्हाला फिरण्याची आवड असेल, तर तुम्हाला हे माहीत असेल की ऑफ सीझनमध्ये डेस्टिनेशनवर कमी गर्दी असते. या काळात तेथील हॉटेल्समध्ये राहणं, खाणं स्वस्तदेखील असतं. त्यामुळे जेव्हाही तुम्ही फिरायला जाण्याचा विचार कराल, तेव्हा तो फक्त ऑफ-सीझनमध्येच करा. यामुळे तुमची ट्रिप कमी पैशांत होईल.

    अशी करा हॉटेलची निवड

    जर तुम्ही खूप प्रवास करत असाल, तर प्रत्येक वेळी फाइव्ह स्टार हॉटेलऐवजी हॉस्टेल किंवा लोकल स्टे हाऊस निवडा. हॉस्टेलमध्ये राहणं स्वस्त असतं, आणि लोकल स्टे हाऊमध्येही तुम्हाला कमी पैशांत चांगली राहण्याची सुविधा मिळते. तुम्ही राहण्यासाठी धर्मशाळासुद्धा निवडू शकता. यामुळे तुमची राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था स्वस्तात होईल.

    बॅकपॅकर सोबत ठेवा

    तुम्ही एकट्यानं प्रवास करीत असाल, तर बॅकपॅकर सोबत ठेवा. तुमचं प्रवासाचं सर्व सामान आणि एक तंबू तुमच्या बॅगेत ठेवा. जेणेकरून तुम्हाला पाहिजे तेथे रात्रीच्यावेळी मुक्काम करता येईल. यामुळे हॉटेलमध्ये किंवा इतरत्र राहण्याचा खर्च वाचतो. शिवाय तुम्हाला तुमच्या आवडीच्या ठिकाणी राहण्याचा पर्याय निवडता येतो.

    खरेदी करणं टाळा

    जर तुम्हाला खरोखरच खूप फिरण्याची, वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देण्याची आवड असेल, तर अशा ठिकाणी गेल्यानंतर विविध वस्तूंची खरेदी करणं टाळा. कारण आजकाल सर्वच शहरांमध्ये सर्व गोष्टी मिळतात. त्यामुळे ट्रिपला गेल्यानंतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करू नका.

    बजेट निश्चित करासर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एखाद्या प्रवासासाठी निघताना त्या प्रवासासाठीचं बजेट निश्चित करा. दर महिन्याला प्रवासावर किती खर्च करावा लागतो, तो तुमच्या महिन्याच्या बजेटपासून वेगळा ठेवा. त्यामुळे तुम्ही वाटेल तेव्हा सहलीला जाऊ शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, डेस्टिनेशन प्लॅनिंग करा. म्हणजे तुम्हाला ट्रिपला कुठे जायचे आहे, त्यानुसार तुमच्या महिन्याच्या बजेटमधून पैसे बाजूला ठेवा.

    फ्लाइटचं आगाऊ बुकिंग करणं फायद्याचं

    ट्रिपला केव्हा जायचं आहे, याचं नियोजन जर तुम्ही खूप अगोदर केलं असेल, तुम्हाला नेमकं कोणत्या दिवशी ट्रिपला निघायचं आहे, याची तारीख माहिती असेल, तर शक्य तितक्या लवकर फ्लाइट बुक करा. लवकर फ्लाइट बुकिंग केल्यामुळे तुम्हाला कमी खर्चात फ्लाइटचं तिकीट मिळेल. वेळेवर फ्लाइट बुकिंग करणं हे खूप महाग आहे. या शिवाय, ट्रेनचं बुकिंग करतानासुद्धा तुम्ही ही काळजी घ्यावी. जेणेकरून तुमचा प्रवासही उत्तम होईल.

    लोकल बसनं प्रवास करा

    ट्रिपला गेल्यानंतर अनेकदा त्या त्या शहरात लोकल प्रवास करण्यासाठी एजंट किंवा हॉटेलच्या वतीनं साइट दाखवण्यासाठी कार दिली जाते. त्याऐवजी तुम्ही स्थानिक बसनं त्या-त्या शहरातील पर्यटनस्थळांना भेट देऊ शकता. यामुळे तुमचा खर्च तर कमी होईलच, पण तुम्ही त्या शहराचं किंवा डेस्टिनेशनचे सौंदर्य अधिक चांगल्या पद्धतीनं पाहू शकाल.

    खाण्यासाठी निवडा हा पर्याय

    हॉटेलमध्ये खाणं पिणं खूप महाग आहे. ट्रिपचं तुमचं बजेट कमी असेल, तर तुम्ही हॉटेलमध्ये खाण्यापिण्यासाठी पैसे खर्च करणं टाळा. त्याऐवजी त्या शहरात, गावातील एखाद्या स्थानिक बाजारात, खाद्यपदार्थांच्या हातगाडीवर जाऊन खा. यामुळे तुमचा खाण्यापिण्याचा खर्च हा कमी होईल. तसंच तुम्हाला त्या ठिकाणचे स्थानिक आणि प्रसिद्ध खाद्यपदार्थही खाता येतील.

    दरम्यान, सुट्टीमध्ये फिरायला जाताना जर योग्य नियोजन केलं, तर कमी बजेटमध्ये चांगली ट्रिप होऊ शकते. त्यासाठी काही टिप्स या अंमलात आणणं गरजेचे असून, त्यामुळे स्वतःचा आर्थिक फायदाही निश्चित होतो.

    First published:

    Tags: Money, Travelling