Home /News /money /

Cryptocurrency मध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणारे देश कोणते? पाहा टॉप 5 देशांची यादी

Cryptocurrency मध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणारे देश कोणते? पाहा टॉप 5 देशांची यादी

क्रिप्टोकरन्सी बूममध्ये सर्वात जास्त योगदान कोणाचे आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? सिंगापूर-आधारित क्रिप्टो पेमेंट सर्व्हिस ट्रिपल-ए च्या डेटानुसार 2021 च्या तिसऱ्या तिमाहीत सर्वात जास्त क्रिप्टो धारक देश कोणते आहेत याबाबत माहिती घेऊया.

पुढे वाचा ...
    मुंबई, 23 एप्रिल : क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) ही जागतिक मालमत्तांपैकी एक बनत असल्याने, गुंतवणूकदार त्यांची संपत्ती वाढवण्यासाठी या डिजिटल मालमत्तेकडे गांभीर्याने पाहत आहेत. याचे कारण म्हणजे यात गुंतवणूक करणाऱ्यांना खूप चांगला परतावा मिळाला आहे. सर्वात जास्त क्रिप्टो धारक असलेल्या देशांवर एक नजर टाकूया. 2021 हे डिजिटल मालमत्तेसाठी (Digital Asset) अनेक प्रकारे ब्रेकआउट वर्ष होते कारण बिटकॉइनचे (Bitcoin) मार्केट कॅप 65,000 डॉलरच्या आजवरच्या उच्चांकावर पोहोचले. या क्रिप्टोकरन्सी बूममध्ये सर्वात जास्त योगदान कोणाचे आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? सिंगापूर-आधारित क्रिप्टो पेमेंट सर्व्हिस ट्रिपल-ए च्या डेटानुसार 2021 च्या तिसऱ्या तिमाहीत सर्वात जास्त क्रिप्टो धारक देश कोणते आहेत याबाबत माहिती घेऊया. ब्राझील : ब्राझील हे लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठे क्रिप्टोकरन्सी मार्केट आहे. 2021 मध्ये सुमारे 1 कोटी क्रिप्टोधारक होते, जे त्याच्या लोकसंख्येच्या सुमारे 4.9 टक्के होते. मात्र ब्राझिलियन नेत्यांनी क्रिप्टोकरन्सी कायदेशीर आणि नियमन करण्यावर जोर दिल्याने ही संख्या वाढेल. क्या बात है! IDBI बँक ग्राहकांसाठी खूशखबर! या योजनेच्या व्याज दरात मोठी वाढ; जाणून घ्या अधिक रशिया : रशिया 1.7 कोटी क्रिप्टो धारकांसह यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. ब्लूमबर्गच्या डेटानुसार, रशियन लोकांकडे 16.5 ट्रिलियन रशियन रूबल पेक्षा जास्त किमतीची क्रिप्टो आहे. ते 200 अब्ज डॉलर किंवा जगाच्या होल्डिंगपैकी 12 टक्के आहे. नायजेरिया : हा आफ्रिकन देश 3.34 कोटी क्रिप्टोधारकांसह जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांपैकी 50 टक्के महिला आहेत. ही माहिती KuCoin च्या “Into the Cryptoverse Report: Nigeria Edition 2022” वरून प्राप्त झाली आहे. जेमिनीच्या सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून असे सूचित होते की येत्या काही वर्षांत ही संख्या लक्षणीयरीत्या वाढू शकते. तुमच्या 'ड्रीम होम'च्या निर्मितीचा खर्च वाढणार, सिमेंट किती रुपयांनी महागणार? अमेरिका : ट्रिपल-ए 2021 मध्ये 2.7 कोटी क्रिप्टो धारकांसह अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. बँक ऑफ अमेरिकाने क्रिप्टो धारकांच्या संख्येत प्रचंड वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यात म्हटले आहे की 2022 पर्यंत, सुमारे 27 टक्के लोकसंख्या किंवा 8.9 कोटी लोक क्रिप्टोकरन्सी वापरतील. भारत : ट्रिपल-ए दावा करतो की भारतीय सर्वात मोठे क्रिप्टो धारक आहेत. लोकसंख्येच्या 7 टक्क्यांहून अधिक लोकांकडे ही डिजिटल मालमत्ता आहे. याचा अर्थ 10 कोटी लोकांकडे ही डिजिटल मालमत्ता आहे, जी 2022 च्या पहिल्या तिमाहीत सुमारे 20 टक्क्यांनी वाढली आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Cryptocurrency, Investment, Money

    पुढील बातम्या