मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol Diesel Prices : कच्च्या तेलाचे दर वाढले, तुमच्या शहरात पेट्रोल वाढलं की घसरलं? पाहा

Petrol Diesel Prices : कच्च्या तेलाचे दर वाढले, तुमच्या शहरात पेट्रोल वाढलं की घसरलं? पाहा

दिवाळीआधी पेट्रोल डिझेलच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे.

दिवाळीआधी पेट्रोल डिझेलच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे.

दिवाळीआधी पेट्रोल डिझेलच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : दिवाळीआधी पेट्रोल डिझेलच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात गेल्या 24 तासांत वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडचे दर पुन्हा एकदा 92 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत.

सरकारी तेल कंपन्यांनीही गुरुवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर जाहीर केले. आजचे दर पाहिले तर यूपी आणि बिहारच्या अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल झाला आहे. नोएडा-ग्रेटर नोएडामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

ग्रेटर नोएडा इथे पेट्रोल 33 पैशांनी वाढून 96.92 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 32 पैशांनी वाढून 90.08 रुपये प्रति लिटर झाले आहे. गाझियाबादमध्ये पेट्रोल 32 पैशांनी कमी होऊन 96.26 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 32 पैशांनी कमी होऊन 89.45 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.

पटना इथे पेट्रोलसाठी 107 रुपयांहून अधिक पैसे मोजावे लागत आहेत. दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्यात आला नाही.

ब्रेंट क्रूड गेल्या 24 तासांत 1.30 डॉलरने वाढून 92.11 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं आहे. तर डब्ल्यूटीआय 85.88 डॉलर प्रति बॅरलने विकत आहे. कच्च तेल जवळपास 2 डॉलरने वधारलं आहे.

ऑनलाईन गेमद्वारे दरवर्षी 80 हजार कोटींचा भारताला फटका; सरकार घेणार मोठा निर्णय

शहरंपेट्रोल प्रति लिटरडिझेल प्रति लिटर
मुंबई106.3194.27
दिल्ली96.7289.62
चेन्नई102.6394.24
कोलकाता106.0392.76
नोएडा96.9290.08
लखनऊ96.5789.76

तेलाचे दर घसरले खरे पण सणासुदीच्या काळात पेट्रोल डिझेलच्या दरात घसरण होणार की नाही याबाबत अजूनतरी कोणतीही माहिती समोर आली नाही. तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलच्या रोजच्या किंमती तुम्ही घरबसल्या पाहू शकता.

राकेश झुनझुनवालांनी गुंतवूणक केलेला हा शेअर झाला 'रॉकेट', अजूनही संधी

इंडियन ऑइलच्या ग्राहकांना आरएसपी आणि त्यांचा सिटी कोड 9224992249 क्रमांकावर लिहून माहिती मिळू शकते आणि बीपीसीएलचे ग्राहक आरएसपी आणि त्यांचा सिटी कोड टाइप करून 9223112222 क्रमांकावर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात.

एचपीसीएलचे ग्राहक एचपीपीआरसीएलचे ग्राहक एचपीप्रिस आणि त्यांचा सिटी कोड लिहून 9222201122 क्रमांकावर पाठवून किंमत पाहू शकता. SMS द्वारे तुम्हाला तुमच्या परिसरातील असे दर पाहता येणार आहेत.

First published:

Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and Diesel price cut, Petrol and diesel prices continued to rise