Home /News /money /

एकाचवेळी दोन कंपन्यांमध्ये करा काम, स्विगीची कर्मचाऱ्यांसाठी भन्नाट ऑफर

एकाचवेळी दोन कंपन्यांमध्ये करा काम, स्विगीची कर्मचाऱ्यांसाठी भन्नाट ऑफर

स्विगीनं (Swiggy) कर्मचाऱ्यांना खूश करायचं ठरवलं आहे. एकाचवेळी दोन कंपन्यांमध्ये काम करण्याची मुभा देणारी मूनलायटिंग पॉलिसी (Moonlighting Policy) स्विगीनं आणली आहे.

    स्विगी, झोमॅटोसारख्या ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्यांवर (Food Delivery Company) आजवर खूप टीका झाली आहे. कर्मचाऱ्यांवर डिलिव्हरी वेळेत करण्याचा दबाव, रस्त्यावरून जाताना कर्मचाऱ्यांचे होणारे अपघात, कर्मचाऱ्यांचं वाईट वर्तन अशा अनेक गोष्टींवरून या कंपन्यांवर टीका झाली आहे. त्यामुळे आता स्विगीनं (Swiggy) कर्मचाऱ्यांना खूश करायचं ठरवलं आहे. एकाचवेळी दोन कंपन्यांमध्ये काम करण्याची मुभा देणारी मूनलायटिंग पॉलिसी (Moonlighting Policy) स्विगीनं आणली आहे. त्यासाठी काही अटीही घालण्यात आल्या आहेत. अर्थात, यामुळे कर्मचारी खूश होतील, की त्यांच्यावरचा दबाव आणखी वाढेल, हे आत्ताच सांगता येणार नाही. 'आज तक हिंदी'नं बाबतचं वृत्तं दिलं आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीनं (Swiggy) एक नवी पॉलिसी आणली आहे. यामुळे स्विगीमध्ये काम करतानाच दुसऱ्या एखाद्या कंपनीत नोकरी करणंही कर्मचाऱ्यांना शक्य होणार आहे. या पॉलिसीला मूनलायटिंग पॉलिसी (Moonlighting Policy) असं म्हटलं आहे. ही पॉलिसी बुधवारी (3 ऑगस्ट 22) सादर करण्यात आली. ऑनलाईन फूड डिलिव्हरी या क्षेत्रात अशा पद्धतीची ही पहिलीच पॉलिसी असल्याचा स्विगीचा दावा आहे. ही पॉलिसी खूप विचारविनिमय करून मगच सादर करण्यात आल्याचं स्विगीनं म्हटलं आहे. कोव्हिड-19 महामारीच्या काळात देशातील मोठ्या समुदायाकडे असलेल्या विविध कौशल्यांचा विकास झाला. अशा लोकांना वेळ आणि संधी मिळाली, तर त्याच्या साह्यानं आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी अशा व्यक्ती जास्तीची कमाई करू शकतात, असं कंपनीचं म्हणणं आहे. (बजरंग पुनियला लागोपाठ दुसऱ्या कॉमनवेल्थमध्ये सुवर्ण पदक, भारताला 7वे गोल्ड!) स्विगीनं नेहमीच कर्मचाऱ्यांच्या इच्छेला प्राधान्य दिलं आहे. त्यांची गरज ओळखून त्यानुसार कंपनीच्या पॉलिसीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. मूनलायटिंग पॉलिसीचा उद्देश कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडीच्या कामात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणं हा आहे. स्विगीला जागतिक पातळीवरील ‘पीपल फर्स्ट’ संघटना बनवण्याच्या दिशेनं उचललेलं हे आमचं पहिलं पाऊल आहे, असं स्विगीचे एचआर प्रमुख गिरीश मेनन यांनी म्हटलं आहे. स्विगीच्या या पॉलिसीनुसार कर्मचारी दुसरीकडे काम करू शकतात, मात्र त्यासाठी कंपनीनं काही नियम घातले आहेत. कर्मचारी कामाचे तास संपल्यावर दुसऱ्या प्रोजेक्टसाठी काम करू शकतात. बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, कंपनीनं असं म्हटलंय की कंपनीच्या उत्पादकतेवर परिणाम न होता कर्मचारी काम संपल्यावर (After Working Hours) किंवा वीकेंडला दुसरी नोकरी करू शकतात. तसंच दुसरीकडे काम करताना स्विगीच्या बिझनेससंबंधी काही अडचण येणार नाही, याचीही काळजी कर्मचाऱ्यांना घ्यावी लागेल. या नव्या पॉलिसीनुसार कर्मचारी एनजीओमध्ये स्वयंसेवक (NGO Volunteer) म्हणून, डान्स इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षक म्हणून काम करू शकतात. कर्मचारी त्यांच्या कौशल्यानुसार कोणतंही काम करू शकतात, मात्र कंपनीच्या नियमांमध्येच ते असलं पाहिजे. अशा पद्धतीनं दोन्हीकडे नोकरी करताना स्विगीमधील कामावर परिणाम होणार नाही, याची काळजी कर्मचाऱ्यांना घ्यावी लागेल. कामात चूक होऊनही चालणार नाही, असं स्विगीनं बजावलेलं आहे. एखाद्या उमेदवाराला नोकरी देताना इतर कुठेही काम न करण्याची अट कंपन्या घालतात. मात्र स्विगीनं कर्मचाऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टीनं या पॉलिसीत बदल केला आहे. त्याचा प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना किती फायदा होतो हे पाहावं लागेल.
    First published:

    Tags: Swiggy

    पुढील बातम्या