• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • SSY: सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करायचीय? मग ही कागदपत्रे आवश्यक, वाचा काय आहेत नियम

SSY: सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करायचीय? मग ही कागदपत्रे आवश्यक, वाचा काय आहेत नियम

तुम्हालाही या योजनेत खातं उघडायचं असेल तर काही आवश्यक कागदपत्रं आवश्यक असून, याचे काही नियम आहेत. ते जाणून घेऊ या.

 • Share this:
  नवी दिल्ली, 31 जुलै : आपल्या लाडक्या मुलीच्या (Girl Child) भविष्यासाठी तरतूद करण्यासाठी अगदी कमी गुंतवणुकीत उत्तम परतावा देणारी सरकारी योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana). या योजनेत करबचतीचाही लाभ मिळतो. सुरक्षित आणि उत्तम परतावा देणारी ही योजना मुलींच्या भविष्याची तरतूद करण्यासाठी अतिशय चांगला पर्याय आहे. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ (Save Girl Child) अभियानाअंतर्गत सरकारनं ही अल्पबचत योजना (Small Saving Scheme) सुरू केली. सर्वाधिक व्याजदर असणारी ही अल्पबचत योजना आहे. तुम्हालाही या योजनेत खातं उघडायचं असेल तर काही आवश्यक कागदपत्रं आवश्यक असून, याचे काही नियम आहेत. ते जाणून घेऊ या. खातं कसं उघडता येईल : सुकन्या समृद्धी योजनेचं खाते पोस्टाच्या (Indian Post Office) कोणत्याही शाखेत किंवा सरकारी बँकेत उघडता येईल. मुलीच्या जन्मापासून ते दहा वर्षं वयाच्या आत मुलीच्या नावे हे खातं उघडता येतं. किमान 250 रुपये भरून हे खातं उघडता येतं. एका आर्थिक वर्षात या खात्यात कमाल दीड लाख रुपये भरता येतात. आवश्यक कागदपत्रं : हे खातं उघडण्यासाठी अर्जाबरोबर मुलीच्या जन्माचा दाखला (Birth Certificate), मुलगी, आई-वडील यांचं ओळखपत्र (पॅनकार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट यापैकी एक) द्यावं लागतं. त्याचबरोबर राहण्याचा पत्ता आणि त्याचा पुरावा याकरिता पासपोर्ट, रेशन कार्ड, लाइट बिल, टेलिफोन बिल किंवा पाणी बिल चालेल. New Rules from August 1: तुमच्या जीवनावर थेट परिणाम करणारे हे 7 नियम बदलणार, उद्यापासून लागू होणार बदल; वाचा सविस्तर कधीपर्यंत खातं सुरू ठेवता येतं : मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत किंवा 18 वर्षांची झाल्यानंतर तिचं लग्न झाल्यास तोपर्यंत हे खातं सुरू ठेवता येतं. आवश्यक तेवढे पैसे जमा न करता आल्यास किती दंड द्यावा लागतो : या योजनेत दर वर्षी किमान 250 रुपये भरावे लागतात. ते भरले नाहीत तर खातं बंद होतं. खातं पुन्हा सुरू करण्यासाठी दर वर्षासाठी 50 रुपये दंड भरून खातं पुन्हा सुरू करता येतं. 15 वर्षांपर्यंत खातं बंद पडल्यास पुन्हा सुरू करण्याची सुविधा मिळते. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 7.6 टक्के असून या योजनेत दरमहा तीन हजार रुपये गुंतवले तर वर्षाला 36 हजार रुपये गुंतवणूक होईल. 14 वर्षांनी 7.6 टक्के दरानं चक्रवाढ व्याज पद्धतीनं 9 लाख 11 हजार 574 रुपये मिळतील. 21 वर्षांनी मुदत संपल्यानंतर तब्बल 15 लाख 22 हजार 221 रुपये मिळतील.
  First published: