मुंबई : तुम्ही जर सुकन्या समृद्धी योजने मध्ये खातं उघडलं असेल आणि तिथे पैसे ठेवत असलात तर तुमच्यासाठी बातमी महत्त्वाची आहे. याशिवाय जे भविष्यात खातं उघडण्याचा विचार करत आहेत त्यांनी तर ही ट्रिक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचा फायदा होईल. राहुल आणि सूरज या दोघांनी आपल्या मुलींच्या नावाने सुकन्या योजनेत खातं उघडलं. त्यासाठी आवश्यत ती सगळी कागदपत्र जमा करून त्यांनी खातं सुरू केलं. दोघंही एकसारखी रक्कम खात्यावर दर महिन्याला जमा करतात. मात्र तरी राहुलला जास्त व्याज मिळतं. सूरजला मात्र व्याज कमी मिळतं यामागे नेमकं काय कारण आहे जाणून घेऊया. राहुलने सुकन्या समृद्धी योजनेत खातं उघडल्यानंतर 1-10 तारखेपर्यंत पैसे जमा केले. तर सूरजने महिन्याची 10 तारीख उलटून गेल्यानंतर रक्कम जमा केली. त्यामुळे जेव्हा सुकन्या समृद्धी योजनेचं व्याज येतं तेव्हा ते 1-10 मध्ये जर पैसे जमा केले तर महिन्याभराचं व्याज तुम्हाला मिळतं. तेच जर रक्कम उशिरा जमा केली तर महिन्याचं व्याज त्याला मिळणार नाही. थेट पुढच्या महिन्याचं व्याज मिळेल. तुम्ही जर ही चूक करत असाल तर ती वेळीच सुधारा कारण यामुळे तुमचंही एका महिन्याचं नुकसान होत आहे. त्यामुळे सुकन्या समृद्धी योजनेसाठी पैसे भरताना ते 1-10 तारखेदरम्यान खात्यात जमा होतील याची काळजी घ्या.
करातूनही सूट सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 80 C अंतर्गत आयकरात सूट देण्यात आली आहे. याला सरकार जास्त व्याज देतं, त्यामुळे ही एक सुरक्षित गुंतवणूक देखील म्हटलं जातं. तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा पोस्टात सुकन्या समृद्धी योजनेसाठी खातं उघडू शकता.