जाहिरात
मराठी बातम्या / मनी / चांगल्या पगाराची नोकरी सोडून उभारला बिझनेस, आता वर्षाकाठी 40 कोटींचा टर्नओव्हर!

चांगल्या पगाराची नोकरी सोडून उभारला बिझनेस, आता वर्षाकाठी 40 कोटींचा टर्नओव्हर!

नीलम सिंग सक्सेस स्टोरी

नीलम सिंग सक्सेस स्टोरी

नीलमने 2018 मध्ये गुरुग्राममध्ये ‘द बर्गर कंपनी’चं पहिलं आउटलेट सुरू केलं, त्यावेळी ती 29 वर्षांची होती.

  • -MIN READ Local18 New Delhi,Delhi
  • Last Updated :

    स्वप्न पूर्ण करायची जिद्द असेल आणि मेहनत करायची तयारी असेल तर कोणतंही कठीण काम करता येऊ शकतं. हेच नीलमसिंग यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. नीलम सिंगने एमबीए केलं आणि त्यांना जेनपॅक्टमध्ये वार्षिक 5 लाख रुपये पगाराची नोकरी मिळाली. पण, उद्योजकतेच्या मार्गाने देशासाठी व्हॅल्यू निर्माण करणे हे तिचे अंतिम ध्येय होतं. एमबीए करत असतानाही तिला क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट सुरू करायचं होतं. स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने QSR कंपनीत इंटर्नशिप केली व नंतर कॉर्पोरेट क्षेत्रात 3 वर्षे काम केले. शेवटी तिने गुरुग्राममध्ये बर्गर कंपनी चालू केली आणि काही वर्षांतच ती देशातील सर्वांत यशस्वी तरुण बिझनेस वूमन बनली. या संदर्भात ‘डीएनए’ने वृत्त दिलंय. नीलमने 2018 मध्ये गुरुग्राममध्ये ‘द बर्गर कंपनी’चं पहिलं आउटलेट सुरू केलं, त्यावेळी ती 29 वर्षांची होती. पाच वर्षांत कंपनीचा टर्नओव्हर 40 कोटी रुपये झाला आहे. राजधानी दिल्लीसह सात राज्यांमध्ये कंपनीचे 100 आउटलेट आहेत. नीलमचे वडील शाळेचे प्रिन्सिपल होते. ती मूळची उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील आहे. तिने ICFAI, हैदराबाद येथून मार्केटिंगमध्ये एमबीए केलं. स्वतःचा ब्रँड तयार करण्यामागील मुख्य कल्पना म्हणजे त्यांना परवडणाऱ्या किमतीत चांगलं फूड व अॅम्बियन्स द्यायचा ही होती. नीलमने विद्यार्थीदशेतच उद्योजक बनण्याचा प्रयत्न केला होता. शिकत असताना एका तीन दिवसांच्या कॅम्पस फेस्टिव्हलमध्ये तिने एक छोटासा फूड स्टॉल लावला होता. तेव्हा अवघ्या 3 दिवसांत तिने 1 लाख रुपयांचा नफा कमावला होता. स्वप्ने साकार करण्यासाठी त्यांनी गुरुग्राममध्ये तीन महिन्यांची इंटर्नशिप केली होती. तिथे मिळणारा चांगला नफा पाहून ती बिझनेस सुरू करण्यास प्रेरित झाली. नीलमने नितेश धनखर यांच्याशी लग्न केलं. एका मॅट्रिमोनियल साइटवरून त्यांची भेट झाली होती. नितेश अमिटी युनिव्हर्सिटीतील असून यशस्वी कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह आहेत. अवघ्या आठ महिन्यांत 5 लाख रुपयांची बचत केल्याचं नीलमने सांगितलं. 2016 मध्ये नोकरी सोडल्यानंतर आपण पालकांकडून एक रुपयाची घेतला नव्हता, असं तिने सांगितलं. या काळात तिने खूप कठीण दिवस पाहिले. तिचं पहिलं आउटलेट ग्लोबल फॉयर मॉल, गुरुग्राम इथं होतं. त्यावेळी नितेश ‘डाबर’मध्ये काम करत होते. त्यांनी खूप साथ दिली आणि नीलमने फ्लोअरिंगपासून ते आउटलेटच्या इंटिरिअरपर्यंत सर्व एकटीने सांभाळलं. तिने लहानशा टीमसह रेस्टॉरंट सांभाळलं. रेस्टॉरंटची कामं करायला ती कधीच मागेपुढे पाहत नाही. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर, नीलमने ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांचे फ्रँचायझी मॉडेल आणले होते. हा लॉकडाउननंतरचा तो काळ होता, जेव्हा अनेकांना उद्योजक बनायचं होतं. त्यानंतर कंपनीची चांगली ग्रोथ झाली. त्यांच्याकडे आता 100 आउटलेट आहेत आणि त्यातले फक्त 1 त्यांचे स्वतःचे आहे. तसेच त्यांच्याकडे 20 लोकांची एक छोटी कॉर्पोरेट टीम आहे. इथल्या बर्गरची किंमत 39 रुपये ते 239 रुपयांदरम्यान आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: business
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात