आता 4 लाखांतही तुम्ही सुरू करू शकता दुप्पट नफा देणारा 'हा' व्यवसाय

कमी खर्चात दुप्पट नफा मिळवून देणारा व्यवसाय करायचा विचार करत असाल तर 'हा' पर्याय प्रायोगिक तत्वावर तुम्ही करू शकता.

News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2019 10:46 AM IST

आता 4 लाखांतही तुम्ही सुरू करू शकता दुप्पट नफा देणारा 'हा' व्यवसाय

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर: तुम्ही जर नोकरी सोडून व्यावसाय करण्याच्या विचारात असाल आणि अगदी कमी खर्चात अधिक नफा मिळवायचा असेल तर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जेमतेम 4 ते 4 लाख 50 हजार इतका खर्च तुम्हाला येणार आहे. हा व्यावसाय तुम्हाला जवळपास खर्चापेक्षा २ लाख अधिक नफा मिळवून देणारा आहे. ससा हा चपळ असणारा प्राणी मात्र सशाला आता बाजारात चांगली किंमत आहे. सशाचं मासं खाण्यासाठी तर सशाच्या लुसलुशीत केसांपासून वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या जातात.

हा व्यवसाय करायचा असल्यास तुम्हाला साधारण 4.50 लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो. हा व्यावसाय करताना तुम्हाला युनिटनुसार ससे घ्यावे लागतात. साधारण विचार केला तर एका युनिटमध्ये 10 ससे असतात. त्यापैकी 3 ससे नर आणि 7 मादा सशांचा समावेश असतो. सशांसाठी विशेष शेड उभी करायची असल्यास साधारण दीड लाखांचा खर्च येतो. पिंजऱ्यांसाठी एक ते दीड लाख खर्च आणि एक युनिटचा जवळपास 2 लाख खर्च येतो असा सर्वसाधारण मिळून साडेचार लाख खर्च होऊ शकतो. ससा चांगल्या ब्रीडचा असेल तर हा खर्च वाढण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

नर आणि मादा ससे साधारण 6 महिन्यांनंतर ब्रीडिंगसाठी तयार होतात. मादा सास एकावेळी साधारण 6 ते 7 पिल्लांना जन्म देते. साधारण 30 दिवसांनंतर ही पिल्ल जन्माला येतात. तर 45 दिवसांमध्ये सशाची पिल्ल 2 किलोग्रॅमची होतात. 2 ते 3 किलोग्राम वजनाचे ससे झाल्यानंतर ते बाजारात विकण्यासाठी तयार होतात.

असा होईल नफा

Loading...

एक मादा सशापासून साधारण 5 पिल्ल होतील असं गृहित धरलं तर 45 दिवसांमध्ये 350 पिल्लं होतात. 10 युनिटमधील सशांची पिल्ल साधारण 45 दिवसांमध्ये विक्रीसाठी तयार होतात. त्यांची बाजारात 2 लाख रुपये किंमत मिळू शकते. बाजारात त्यावेळी सुरु असलेल्या भावानुसार सशांच्या किंमतीमध्ये बदल होऊ शकतात. यांना वेगवेगळ्या फार्मध्ये ब्रीडिंगसाठी, मांस किंवा यांच्या अंगावरील केसांचा वापर वेगवेगळ्या वस्तू तयार करण्यासाठी केला जात असल्यानं त्यासंबंधीत व्यवसायिकांना हे ससे विकले जातात. एक मादा ससा ही एका वर्षात कमीत कमी 7 वेळी पिल्ल देते. त्यासाठी तिची योग्य ती काळजी आणि योग्य ती इंजेक्शन देणं आवश्यक आहे.

मादी ससा आजारी पडली किंवा एखाद्या आजारामुळे पिल्ल गेली तरीही साधारण 5 वेळा ससा मादी पिल्लं देऊ शकते असा विचार केला तरीही 10 लाख रुपयांचे ससे विकले जाऊ शकतात. सशासाठी लागणारा चारा हा 3 लाखांचा खर्च वगळला तरीही 7 लाखांचा नफा आपल्याला मिळतो. सुरुवातीला होणारी साडे चार लाखांची इन्वेस्टमेंट वगळता बाकी जास्त पैसे घालावे लागत नाहीत. सशांच्या चाऱ्यावर आणि औषधांचा खर्च वगळता तुम्हाला 7 लाखांचा नफा होतो.

तुम्हाला नवा व्यवसाय सुरू करण्याची रिस्क घ्यायची नसेल तर तुम्ही ससा पालनाची फ्रेंचायजी घेऊन हा व्यावसाय प्रायोगिक तत्वावर सुरू करू शकता. यासाठी विशेष ट्रेनिंगही आहेत. तुम्ही सुरुवाला हे ट्रेनिंग घेऊनही हा व्यवसाय सुरू करू शकता.

'बाला' सह हाऊसफुल्ल-4 ची टीम निघाली रेल्वेनं, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 18, 2019 09:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...