जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Travel Credit Cards: प्रवासाची आवड असणाऱ्यांसाठी स्पेशल क्रेडिट कार्ड्स; मिळतील अनेक ऑफर्स

Travel Credit Cards: प्रवासाची आवड असणाऱ्यांसाठी स्पेशल क्रेडिट कार्ड्स; मिळतील अनेक ऑफर्स

Travel Credit Cards: प्रवासाची आवड असणाऱ्यांसाठी स्पेशल क्रेडिट कार्ड्स; मिळतील अनेक ऑफर्स

MakeMyTrip आणि ICICI बँकेचे हे कार्ड सदस्याला MyCash म्हणून 1500 रुपये देते. 2500 रुपयांचे MMT हॉलिडे व्हाउचर, MMT कॅब डिस्काउंट, MMBLACK चे सदस्यत्व यासह विविध फायदे ऑफर करतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 जुलै : अनेकांना आपल्या व्यस्त शेड्युलमधून फिरायला आवडते. प्रवास म्हटलं की बऱ्याच गोष्टी त्यात येतात. ट्रान्सपोर्ट, राहणे, खाणे सगळंच त्यात येत. तुम्हीही प्रवासासाठी किंवा कामानिमित्त भारत आणि परदेशात फिरत असाल तर ही 3 ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि उपयुक्त ठरू शकतात. याबद्दल जाणून घेऊया. एअर इंडिया एसबीआय सिग्नेचर कार्ड SBI चे हे कार्ड हवाई सेवा देणाऱ्या एअर इंडियाशी कोलॅबोरेट करून ग्राहकांसाठी आणले आहे. हे कार्ड घेतल्यावर, वेलकम गिफ्ट म्हणून 20000 रिवॉर्ड पॉइंट्स आणि 5000 अॅनिव्हसरी रिवॉर्ड पॉइंट्स दरवर्षी उपलब्ध आहेत. याशिवाय 1 लाख बोनस पॉइंट रिवॉर्ड पॉइंट्स वार्षिक उपलब्ध आहेत. यासह, देशांतर्गत व्हिसा लाउंज आणि परदेशी लक्झरी लाउंजमध्ये प्रवेश करण्याचा लाभ देखील उपलब्ध आहे. कार्डधारकाला 1 लाखाचा विमा मिळतो. कार्डची वार्षिक जॉइनिंग फी 4,999 रुपये आहे आणि व्याज दर 3.5 टक्के आहे. Nirav Modi: EDची मोठी कारवाई, नीरव मोदीची 253 कोटींची मालमत्ता जप्त इंटरमाइल्स एचडीएफसी बँक डायनर्स क्लब जे लोक अनेकदा विमानाने प्रवास करतात त्यांच्यासाठी एचडीएफसीचे हे ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड खूप फायदेशीर ठरू शकते. या कार्डसह, वेलकम गिफ्ट्स, 3,000 रुपये किमतीचे हॉटेल बाउचर आणि बरेच इंटरमाईल बोनस पॉइंट्स उपलब्ध आहेत. एतिहादसह ​​अनेक विमान कंपन्यांच्या बिझनेस आणि इकॉनॉमी क्लासवर 5 ते 10 टक्के सूट देखील उपलब्ध आहे. कार्डधारकांना भारतासह जगभरातील 1000 हून अधिक विमानतळांच्या विश्रामगृहात प्रवेश मिळतो. यासह, 2 कोटी रुपयांचे हवाई अपघात कव्हर आणि 50 लाख रुपयांचे परदेशी हॉस्पिटलायझेशन कव्हर उपलब्ध आहे. त्याची जॉइनिंग फी 5000 रुपये आहे आणि व्याज दर 1.99 टक्के आहे. फायद्याची बातमी! वस्तू बिघडल्यास कंपनीलाच रिपेअर करावी लागणार; केंद्राकडून नव्या कायद्याची तयारी मेकमायट्रिप आयसीआयसीआय बँक सिग्नेचर क्रेडिट कार्ड MakeMyTrip आणि ICICI बँकेचे हे कार्ड सदस्याला MyCash म्हणून 1500 रुपये देते. 2500 रुपयांचे MMT हॉलिडे व्हाउचर, MMT कॅब डिस्काउंट, MMBLACK चे सदस्यत्व यासह विविध फायदे ऑफर करतात. यासह 3999 रुपयांपर्यंतचा एअरटेल इंटरनॅशनल रोमिंग पॅक विमानतळ लाउंज आणि रेल्वे लाउंजमध्ये प्रवेश प्रदान करतो. कार्डची जॉइनिंग फी 2500 रुपये आहे आणि त्याचा व्याज दर 3.5 टक्के आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात