जाहिरात
मराठी बातम्या / मनी / काहीच दिवसांत संपणार ‘या’ सरकारी बँकेची धमाकेदार FD स्कीम, आजच करा गुंतवणूक

काहीच दिवसांत संपणार ‘या’ सरकारी बँकेची धमाकेदार FD स्कीम, आजच करा गुंतवणूक

काहीच दिवसांत संपणार ‘या’ सरकारी बँकेची धमाकेदार FD स्कीम, आजच करा गुंतवणूक

काहीच दिवसांत संपणार ‘या’ सरकारी बँकेची धमाकेदार FD स्कीम, आजच करा गुंतवणूक

इंडियन बँकेनं 610 दिवसांची विशेष एफडी योजना सुरू केली आहे. या विशेष FD योजनेचं नाव IND UTSAV 610 आहे. या योजनेची समाप्ती तारीख 31 ऑक्टोबर 2022 आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 ऑक्टोबर: जर तुम्ही अशा गुंतवणूकदारांपैकी एक असाल ज्यांना जोखीम न घेता निश्चित परतावा हवा आहे, तर तुम्ही मुदत ठेवीमध्ये (FD) गुंतवणूक करू शकता. सार्वजनिक क्षेत्रातील प्रसिद्ध बँक इंडियन बँक गुंतवणूकदारांसाठी एफडीची खास स्कीम देत आहे. या स्कीमचं नाव इंड उत्सव 610 (IND UTSAV 610) आहे. बँकेनं 14 सप्टेंबर रोजी ही बँकेनं ही स्कीम सुरू केली होती. गुंतवणूकदार 31 ऑक्टोबरपर्यंत या योजनेत गुंतवणूक करू शकतात. अति ज्येष्ठ नागरिकांना 6.5% वार्षिक व्याज- या FD योजनेत बँक चांगला परतावा देत आहे. या विशेष एफडी योजनेतील मॅच्युरिटी कालावधी 610 दिवसांचा असेल. या विशेष एफडी योजनेवर सर्वसामान्यांना 6.10 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना 6.25 टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना 6.5 टक्के वार्षिक व्याज मिळेल. इंडियन बँकेने आपल्या वेबसाइटवर माहिती दिली आहे- इंडियन बँकेने आपल्या वेबसाइटवर इंड उत्सव 610 योजनेची माहिती दिली आहे. यामध्ये ही एफडी स्कीम कशी बुक करता येईल हे देखील सांगण्यात आलं आहे. या योजनेतील गुंतवणूक INDOASIS मोबाइल अॅपद्वारे घरबसल्या करता येते. या FD योजनेसाठी खातं कोणत्याही कागदपत्रांशिवाय घरी बसून ऑनलाइन उघडता येतं. हेही वाचा:  Business Idea: सणासुदीत सुरू करा पेपर कपचा व्यवसाय, मिळेल लाखो रुपयांचा नफा, सरकारही करतं मदत RBI ने रेपो रेट 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्के केला- अलीकडेच आरबीआयने रेपो रेट 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्के केला आहे. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले आहे. यापूर्वी मे महिन्यात 0.40 टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर जून आणि ऑगस्टमध्ये 0.50-0.50 टक्क्यांनी वाढ झाली होती. एकंदरीत, मे पासून आत्तापर्यंत, RBI ने रेपो दरात 1.90 टक्क्यांनी वाढ केली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

अनेक बँकांनी एफडीचे दर वाढवले ​​आहेत आरबीएल बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, सीएसबी बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक इत्यादींनीही त्यांच्या मुदत ठेवींच्या दरात वाढ केली आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर दर वाढवण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात