• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • विक्रमी दर देणाऱ्या हिंगोली बाजार समितीत सोयाबीनची आज काय अवस्था? वाचा राज्यातील लेटेस्ट दर

विक्रमी दर देणाऱ्या हिंगोली बाजार समितीत सोयाबीनची आज काय अवस्था? वाचा राज्यातील लेटेस्ट दर

काढणी, मळणी, वाहतूक आणि खर्च पाहता सोयाबीनची सध्याच्या भावात विक्री केल्यास नुकसानच होणार आहे. त्यामुळे भविष्यात दर वाढेल या आशेने राज्यातील शेतकरी साठवणूक करण्यावर भर देत आहे.

 • Share this:
  मुंबई, 27 ऑक्टोबर : पावसाने पिकाचे नुकसान होण्यापूर्वी हिंगोली बाजारात सोयाबीनला (soybean) विक्रमी भाव मिळाला. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना यंदा चांगले दिवस येतील, असे राज्यभरात चांगले चित्र निर्माण झाले होते. हिंगोली बाजार समितीतील सार्वजनिक लिलावात सोयाबीनचा भाव 11,021 रुपये प्रति क्विंटल होता. मात्र, त्याच कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सोयाबीन 4 हजार 600 ते 4 हजार 800 दराने विकले जात आहे. अवघ्या दीड महिन्यात सोयाबीनचे भाव इतके घसरले आहेत की, शेतकरी विक्रीपेक्षा साठेबाजीवर अधिक भर देत (soybean rate today market) आहेत. सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनत आणि पैसा खर्च केला आहे. तुषार सिंचनावरील खर्च आणि किडीचा प्रादुर्भाव वाढल्यावर वेळोवेळी फवारणी केल्याने या वर्षी पिकावरील खर्चात वाढ झाली आहे. मात्र, आता सोयाबीनला साडेचार हजार रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे काढणी, मळणी, वाहतूक आणि खर्च पाहता सोयाबीनची सध्याच्या भावात विक्री केल्यास नुकसानच होणार आहे. त्यामुळे भविष्यात दर वाढेल या आशेने राज्यातील शेतकरी साठवणूक करण्यावर भर देत आहे. हे वाचा - वकिलाच्या प्रत्येक प्रश्नावर आरोपी म्हणायचा म्याऊ म्याऊ! न्यायाधीश वैतागले आणि… शेतकऱ्यांचा तोटा सप्टेंबरमध्ये हंगामाच्या सुरुवातीला हिंगोलीतील एका शेतकऱ्याला सोयाबीनला प्रतिक्विंटल 11 हजार रुपये भाव मिळाला होता. या दराची राज्यभर चर्चा होती. सध्या सर्वात कमी दर हिंगोली बाजार समितीत मिळत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कमाल दर 4,600 आणि किमान 4,800 आहे. इतर बाजार समित्यांच्या तुलनेत हिंगोली बाजार समितीत सोयाबीनला भाव कमी मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हंगामाच्या सुरुवातीला विक्रमी दराने हंगाम सुरू झाला, मात्र आता कमी दराची चर्चा होत आहे. हे वाचा - Jalyukt Shivar योजनेला ठाकरे सरकारची क्लीन चिट मिळाल्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया भाव घसरण्याचे कारण काय? केंद्र सरकारने 12 लाख मेट्रिक टन सोयामील आयात करण्यास दिलेली परवानगी हेही सोयाबीनचे दर घसरण्याचे कारण सांगितले जात आहे. शेतकरी नेते अजित नवले यांच्या म्हणण्यानुसार, सोयामील आयातीच्या निर्णयामुळे नवीन पिकाला भाव मिळत नाही. आपल्या देशात पुरेसे उत्पादन असताना शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठी आयात का करण्यात आली. आता परिस्थिती पाहता यंदा सोयाबीनच्या भावात क्विंटलमागे तीन हजार रुपयांची घसरण होईल, असे दिसते. राज्यातील सोयाबीनचे आजचे दर -
  दिनांक जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
  27/10/2021 अहमदनगर पिवळा क्विंटल 7 4000 4500 4500
  27/10/2021 अकोला पिवळा क्विंटल 3880 4350 4850 4635
  27/10/2021 औरंगाबाद पिवळा क्विंटल 18 4051 4600 4450
  27/10/2021 बीड --- क्विंटल 11 4101 4400 4350
  27/10/2021 बीड पिवळा क्विंटल 70 4370 4865 4700
  27/10/2021 बुलढाणा लोकल क्विंटल 3120 4000 5150 5000
  27/10/2021 बुलढाणा पिवळा क्विंटल 120 3500 5000 4500
  27/10/2021 हिंगोली लोकल क्विंटल 1000 4500 5005 4752
  27/10/2021 हिंगोली पिवळा क्विंटल 1150 4000 4700 4350
  27/10/2021 जळगाव --- क्विंटल 45 4200 4600 4200
  27/10/2021 जळगाव लोकल क्विंटल 200 4400 5004 5004
  27/10/2021 जळगाव पिवळा क्विंटल 160 3695 4945 4560
  27/10/2021 लातूर --- क्विंटल 7500 5000 5025 5012
  27/10/2021 लातूर पिवळा क्विंटल 440 3901 4855 4660
  27/10/2021 नागपूर लोकल क्विंटल 4900 4000 5002 4752
  27/10/2021 नांदेड पिवळा क्विंटल 765 3200 4909 4054
  27/10/2021 नाशिक पिवळा क्विंटल 30 3500 4721 4641
  27/10/2021 उस्मानाबाद पिवळा क्विंटल 200 4500 4881 4690
  27/10/2021 परभणी --- क्विंटल 500 4000 4721 4551
  27/10/2021 परभणी पिवळा क्विंटल 1049 4567 5015 4826
  27/10/2021 सोलापूर लोकल क्विंटल 362 4200 5000 4880
  27/10/2021 वाशिम --- क्विंटल 9000 3915 4950 4500
  27/10/2021 यवतमाळ पिवळा क्विंटल 850 4800 5000 4900
  राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) 35377
  दर स्त्रोत - महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ
  Published by:News18 Desk
  First published: