नितीन नांदुरकर, प्रतिनिधी, जळगाव : यंदा धोंड्याचा महिना हा श्रावण आला आहे. 18 जुलैपासून धोंड्याच्या महिन्याला सुरुवात होत आहे. धोंड्याला जावयाला वाण देण्यासाठी सराफ मार्केटमध्ये गर्दी झाली आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर वाढत आहेत. तर दुसरीकडे सोन्याचे दर जास्त असल्याने चांदीची मागणीही वाढली आहे. त्यामुळे चांदीचे दरही वाढले आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. झाल्याने दोनच दिवसांत चांदीच्या भावात 4 हजार 200 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी 75 हजार 700 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. सोन्याच्या भावात मात्र किरकोळ चढ उतार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदी 70 ते 71 हजार रुपये प्रति किलोवर होती.
12 जुलै रोजी 71 हजार 500 रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात 13 रोजी 2 हजार 800 रुपयांची वाढ होऊन ती 74 हजार 300 रुपये प्रति किलोवर पोहोचली. त्यानंतर 14 रोजी पुन्हा एक हजार 400 रुपयांची वाढ होऊन ती 75 हजार 700 रुपये प्रति किलोवर पोहचली.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सट्टा बाजारात दलालांनी चांदीची अचानक मागणी वाढली. त्यामुळे चांदीच्या भावात वाढ झाली असल्याचे सांगितले जात आहे. सोन्याच्या भावात मात्र किरकोळ चढ-उतार सुरू आहे. 13 जुलै रोजी 59 हजार 700 रुपये प्रति तोळ्यावर असलेल्या सोन्याच्या भावात 14 रोजी 100 रुपयांची घसरण होऊन ते 59 हजार 600 रुपये प्रति तोळ्यावर आले आहे.
सोन्याचे दर 1 ग्रॅम, 24 कॅरेट - 6000 1 ग्रॅम, 22 कॅरेट - 5,500 10 ग्रॅम, 24 कॅरेट - 55000 10 ग्रॅम, 22 कॅरेट - 60,500