नवी दिल्ली, 07 जून : 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशात नोटाबंदीची (demonetization) घोषणा झाली आणि एकच हलकल्लोळ माजला. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्या. त्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली. महात्मा गांधी सीरिजच्या (Mahatma Gandhi Series) या नोटा या दिवसानंतर निरुपयोगी ठरल्या. त्यांचं मूल्य शून्य झालं. परंतु, आता याच नोटा पैसे कमवून देऊ शकतात. आठवण म्हणून किंवा अन्य काही कारणाने तुमच्याकडे या जुन्या नोटा ठेवल्या असतील तर त्या तुम्हाला मालामाल करू शकतात. तुमच्याकडे 500 रुपयांची (500 Rs. Currency note) एक विशिष्ट नोट असेल तर तुम्हाला त्यासाठी दहा हजार रुपये मिळू शकतात. तेव्हा जुन्या नोटा असतील तर त्या काढून तपासा आणि आपल्या कमाईचा मार्ग प्रशस्त करा.
आपल्याला माहितचं आहे की, कोणत्याही नोटेची छपाई भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) करते. या नोटांची छपाई अत्यंत काळजीपूर्वक केली जाते. तसंच यासाठी एक निश्चित पॅटर्न (Fix Pattern) ठरलेला असतो आणि त्यानुसारच नोटांची छपाई होते. परंतु, नोटांची छपाई करताना कोणत्याही प्रकारे चूक झाली आणि ती नोट तशीच बाजारात आली तर ती नोट खास ठरते. आज आम्ही तुम्हाला अशाच खास नोटेविषयी सांगणार आहोत. या नोटेच्या छपाईदरम्यान चूक (Printing Mistake) झाली होती. त्यामुळे नोटबंदीनंतरही लोक ही खास नोट खरेदी करण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्यासाठी तयार आहेत.
हे वाचा - महिन्याला 4500 रुपये गुंतवणूक करुन मिळवता येतील 1 कोटी, वाचा या योजनेबाबत
या 500 रुपयांच्या नोटेची छपाई करताना एक चूक झाली होती. या नोटांमध्ये सीरियल नंबर दोनदा छापला गेला होता. तुमच्याकडे अशी दोनदा सीरियल नंबर छापलेली 500 रुपयांची जुनी नोट असेल तर तुम्ही ती 5 हजार रुपयांना ऑनलाइन (Online) विकू शकता. प्रिटींग मिस्टेक व्यतरिक्त अजून एक 500 रुपयांची जुनी नोट विशेष आहे. तीदेखील तुम्हाला मालामाल करू शकते. या नोटेच्या कडेला जास्तीचा पेपर सुटला गेला आहे. तुमच्याकडे अशी जास्त पेपर सुटलेली 500 रुपयांची नोट असेल तर तिची ऑनलाईन 10 हजारांना विक्री होत आहे. त्यामुळे तुमच्याकडे अशी 500 रुपयांची नोट असेल तर ती तुम्हाला 10 हजार रुपये कमवून देईल.
हे वाचा - मोफत धान्य मिळवण्यासाठी घरबसल्या बनवा Ration Card, ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस
नोटेमधील एक चूक तिला खास बनवते आणि तिचं मूल्य अधिक वाढवते. अनेक लोकांना अशा नोटा जमा करण्याचा छंद असतो. तुमच्याकडे वरती सांगितल्याप्रमाणे 500 रुपयांची जुनी नोट असेल तर तुम्ही घरबसल्या तिची ऑनलाइन विक्री करू शकता. Oldindiacoin.com या वेबसाईटवर या नोटेची विक्री करता येते. यासाठी तुम्ही अशा नोटेचा एक फोटो काढा आणि विक्रेता म्हणून रजिस्टर (Register) करा आणि नोटांची विक्री सुरू करा. व्यावाहारिकदृष्ट्या निरुपयोगी नोटांपासून कमाई करण्याचा हा मार्ग तुम्हाला मालामाल करेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money