जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सरपंचाने खरचं गावचा विकास केला का, कोणता निधी कुठे खर्च केला? पाहा एका क्लीकवर

सरपंचाने खरचं गावचा विकास केला का, कोणता निधी कुठे खर्च केला? पाहा एका क्लीकवर

सरपंचाने खरचं गावचा विकास केला का, कोणता निधी कुठे खर्च केला? पाहा एका क्लीकवर

तुमच्या गावातील सरपंचाने त्याला मिळालेल्या निधीचा कसा वापर केला हे आता तुम्ही घरबसल्या देखील पाहू शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे आणि  येत्या  १८ डिसेंबर ला ७७५१ ग्रामपंचायतींसाठी  मतदान होणार आहे, निवडणूक जवळ आली कि गावकरी जागे होतात . सरपंचाने कोणता निधी कुठे आणि कशावर खर्च केला ? ज्या गावातील कामासाठी खर्च केला तिथे नक्कीच गरज होती का ? मग गावकऱ्यांना वाटत कि ग्रामपंचायतीने गावाचा काहीच विकास केला नाही ? सरपंच आणि सदस्यांनी गावाचा विकास केला का यावर शंका उपस्थित होते . तुम्हाला ग्रामपंचायतीने खरचं विकास केला का ? केंद्राने आणि राज्याने दिलेला निधी खर्च केला गेला का ? याबाबतची माहिती तुम्हाला अवघ्या एका क्लीकवर मिळू शकते. तुमच्या गावातील सरपंचाने त्याला मिळालेल्या निधीचा कसा वापर केला हे आता तुम्ही घरबसल्या देखील पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे आणि कसा हा निधी कुठे खर्च झाला ते शोधायचं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. १) सर्वप्रथम तुम्हाला गूगल प्ले स्टोअरवरून “ई-ग्राम स्वराज’ नावाचं ऍप डाउनलोड करावं लागेल ऍप ओपन झाल्यावर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. त्याच बरोबर ह्या दिलेल्या वेबसाईट वरून देखील तुम्ही हि माहिती घेऊ शकता ( https://egramswaraj.gov.in/financialProgressReport.do) २) यामध्ये तुम्हाला आधी “स्टेट’मध्ये तुमचं राज्य, त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये तुमचा जिल्हा, ब्लॉक पंचायतमध्ये तालुका आणि व्हिलेज पंचायतमध्ये गावाचं नाव निवडायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. eGramSwaraj – Apps on Google Play ३) त्यानंतर  तुम्हाला ज्या आर्थिक वर्षासाठीची माहिती पाहायची आहे, ते वर्ष निवडायचं त्यानंतर तुमच्यासमोर तीन वेगवेगळे पर्याय येतात. यातला सगळ्यात पहिला पर्याय असतो ER Details. यामध्ये ER म्हणजेच elected representative म्हणजेच गावातील निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची माहिती असते या पर्यायावर क्‍लिक केलं की तुम्हाला गावातील सरपंच, सचिव व ग्रामपंचायत सदस्यांची सविस्तर माहिती दिसेल. त्यांचे नाव, पद, वय, जन्मतारीख अशी माहिती असते. या ऍपमध्ये माहिती भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे त्यामुळे या पर्यायामध्ये माहिती  दिसेलच अस नाही .पण, असं असलं तरी गावाच्या विकासकामासाठी सरकारनं किती पैसा दिला आणि त्यातला किती पैसा ग्रामपंचायतीनं खर्च केला, हे मात्र तुम्ही नक्कीच पाहू शकता. ४) त्यानंतर दुसरा पर्याय आहे तो Approved activities. यात ग्रामपंचायतीला कोणत्या कामांसाठी किती निधी मंजूर करण्यात आला याची माहिती मिळेल . ५) त्यानंतर तिसरा पर्याय आहे  Financial Progress. यात गावाच्या आर्थिक प्रगतीविषयी माहिती दिलेली आहे  यात आपण जे आर्थिक वर्ष निवडलेलं आहे ते सुरवातीला तिथं दिलेलं असतं. त्यानंतर गावाचा कोड आणि नाव दिलेलं असेल . त्यानंतर त्या आर्थिक वर्षात तुमच्या गावासाठी किती निधी आला त्याची रक्कम receipt या पर्यायासमोर दिलेली असेल . आणि त्यापैकी किती निधी खर्च झाला, ही रक्कम expenditure या पर्यायासमोर दिलेली दिसेल त्याखाली List of schemes हा पर्याय आहे . यामध्ये ग्रामपंचायतीला जो एकूण निधी मिळाला, त्याची विभागणी केलेली आहे .

News18लोकमत
News18लोकमत

यात कोणत्या योजनेअंतर्गत किती निधी मिळाला व त्यापैकी किती निधी खर्च झाला याची माहिती आहे . शेवटचं आणि महत्वाचं जर दिलेला निधी उरला तर काय ? बऱ्याच ग्रामपंचायती दिलेल्या निधीपैकी ४० ते ५० टक्के सुद्धा निशी निधी खर्च करू शकत नाहीत त्यामुळे ग्रामपंचायतींनी खर्च न केलेला निधी सरकारला परत जातो त्यामुळे गावचा विकास अर्धवट राहतो हे मात्र नक्की .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात