जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सिमकार्ड आणि नवीन खातं उघडण्यासाठी बदलणार नियम, आजच माहिती करून घ्या नाहीतर....

सिमकार्ड आणि नवीन खातं उघडण्यासाठी बदलणार नियम, आजच माहिती करून घ्या नाहीतर....

सिमकार्ड आणि नवीन खातं उघडण्यासाठी बदलणार नियम, आजच माहिती करून घ्या नाहीतर....

5G सिमकार्ड किंवा नवीन सिमकार्ड घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : कोरोनापासून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता सिमकार्ड आणि बँकिंग दोन्ही क्षेत्रांमधील नियम अधिक सक्तीचे केले जाण्याची शक्यता आहे. याबाबत सध्या चर्चा सुरू असून लवकरच नवी नियमावली येण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकरणांवर आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी सरकार नवीन सिमकार्ड जारी करणं आणि नवीन खातं उघडण्यावर काही निर्बंध आणि कठोर नियम लावले जाऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, टेलिकॉम ऑपरेटर आणि बँकांसाठी फिजिकल व्हेरिफिकेशनचा नियम अनिवार्य केले जाण्याची शक्यता आहे. KYC सक्तीचं होणार नवीन सिमकार्ड देण्यासाठी आणि नवीन खातं उघडण्यासाठी बँकेत KYC करावं लागेल अशी सक्ती करण्यात येण्याची शक्यता आहे. यासाठी फिजिकल व्हेरिफिकेशन आवश्यक असणार आहे. टेलीकॉम ऑपरेटर आणि बँकासाठी सरकार लवकरच निर्देश देण्याची शक्यता आहे. गृह मंत्रालयाने या विषयावर वित्त मंत्रालय, कॉर्पोरेट व्यवहार आणि दूरसंचार मंत्रालयासोबत आढावा बैठक घेतली आहे. आता फक्त आधारकार्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर नवीन सिमकार्ड घेता येते. आधार कार्ड व्हेरिफाय केल्यानंतर नवीन खातं उघडलंही जातं.

पुण्यातील सहकारी बँकेला झटका, रिझर्व्ह बँकेने रद्द केला परवाना, ग्राहकांच्या पैशांचे काय होणार?

News18लोकमत
News18लोकमत
PM Ujjwala Yojana: घरा-घरात मोफत गॅस सिलिंडरची सुविधा, काय आहे ही योजना

नवा नियमाचे फायदे कंपन्यांचं खातं Incorporation सर्टिफिकेटवर उघडलं जातं. या सगळ्या गोष्टी आता प्रत्यक्षात फिजिकल KYC केल्याशिवाय सुरू होऊ नयेत असा प्रस्ताव देण्यात आला आहे. फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी हा नियम करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता हा नवा नियम जर आला तर KYC सगळीकडे KYC सक्तीचं होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात