• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • डेन्मार्कच्या STIESDAL सोबत RELIANCEच्या कंपनीचा करार, GREEN ENERGY च्या दिशेनं मोठं पाऊल

डेन्मार्कच्या STIESDAL सोबत RELIANCEच्या कंपनीचा करार, GREEN ENERGY च्या दिशेनं मोठं पाऊल

भारतात ग्रीन एनर्जीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या Reliance New Energy Solar (RNESL) या कंपनीचा डेन्मार्कच्या STIESDAL कंपनीसोबत करार झाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 13 ऑक्टोबर : भारतात ग्रीन एनर्जीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या Reliance New Energy Solar (RNESL) या कंपनीचा डेन्मार्कच्या STIESDAL कंपनीसोबत करार झाला आहे. ऊर्जेच्या निर्मितीसाठी अत्यावश्यक असणाऱ्या हायड्रोजन इलेक्टोलायजर्सच्या निर्मितीसाठी हा करार करण्यात आला आहे. RNESLकंपनीला यासाठीचे लायलन्स मिळाले असून पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेत हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे. STIESDAL सोबत ऐतिहासिक करार STIESDAL ही डेन्मार्कमधील जगविख्यात कंपनी आहे. डेन्मार्कमधील तिसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर असणाऱ्या ओडेन्स शहरात या कंपनीचं मुख्य कार्यालय आहे. रिलायन्स कंपनीच्या ‘1-1-1 ग्रीन हायड्रोजन प्रॉडक्शन’ या मोहिमेला या करारामुळं बळकटी मिळाली आहे. या करारामुळे आता रिलायन्स परिवारातील एक कंपनी असणाऱ्या रिलायन्स न्यू एनर्जी सोलार, या कंपनीला हायड्रोजन इलेक्टोलायजर्सच्या संशोधन आणि निर्मितीचं काम मिळणार आहे. पर्यावरण रक्षणासाठीचे करार या दोन कंपन्यांनी पर्यावरण रक्षणाच्या धर्तीवर इतरही अनेक करार केले आहेत. त्यामध्ये पवनऊर्जेशी संबंधित काही प्रकल्पांचाही समावेश आहे. हायड्रोजनपासून वीजनिर्मिती करणाऱ्या काही इतर प्रकल्पांच्या उभारणीबाबतही या दोन कंपन्यांनी करार केले आहेत. ग्रीन एनर्जीकडे वाटचाल या दोन कंपन्यांमध्ये झालेला करार हा ग्रीन एनर्जीच्या दिशेनं टाकलेलं एक मोठं पाऊल असल्याची प्रतिक्रिया रिलायन्स इंडिया लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी दिली आहे. सौर ऊर्जेबाबत सुरू असणाऱ्या प्रकल्पांच्या जौडीला आता हे नवे प्रकल्पही येत असल्यामुळे प्रदुषण कमी होऊन ग्रीन एनर्जीच्या दिशेनं देश पाऊल टाकत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. हे वाचा - महात्मा गांधींच्या सूचनेनुसार सावरकरांनी केलेली दया याचिका : राजनाथ सिंह रिलायन्सची नवी दिशा रिलायन्सने प्रदुषण कमी करून अधिकाधिक ग्रीन एनर्जी तयार करण्याच्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली आहे. रिलायन्स इंडिया लिमिटेडच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतच चेअरमन मुकेश अंबानी यांनी ग्रीन एनर्जी क्षेत्रात काही महत्त्वाचे करार होणार असल्याचं सुतोवाच केलं होतं. त्यातील हा एक मोठा करार नुकताच पार पडला आहे.
  Published by:desk news
  First published: