मुंबई, 1 ऑक्टोबर : अबुधाबीची मुबादला इन्व्हेस्टमेंटने ( Mubadala Investment Co ) रिलायन्स इंडस्ट्रीज् (RIL) मध्ये मोठी गुंतवणूक करण्याचं घोषित केलं आहे. 6,247.5 कोटींच्या गुंतवणूक करून त्या बदल्यात 1.4 टक्के RIL चे शेअर मुबादलाकडे जातील. भारतीय व्यापार क्षेत्रात जागतिक गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढावी यासाठी प्रयत्न केला जात आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये गेल्या नुकतीच सिल्व्हर लेक आणि जनरल अथलांटिक यांनीही गुंतवणूक केली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज् कडून मिळालेल्या माहितीनुसार सिल्व्हर लेक इंडस्ट्रीज आणखी 1 हजार 875 कोटींची गुंतवणूक रिलायन्समध्ये करणार आहे. सिल्व्हर लेक इन्व्हेस्टमेंट भारतातील सर्वात मोठी ब्रिक्स आणि मोटार इंडस्ट्री आहे. रिलायन्स रिटेल ऑपरेटर्स भारताची सर्वात मोठी आणि वेगाने विस्तार होणारी कंपनी आहे.
रिलायन्स समूहाने (RIL) बुधवारी अशी माहिती दिली आहे की, प्रायव्हेट इक्विटी फर्म सिल्व्हर लेक (Silver Lake Partners)चे सह-गुंतवणूकदार रिलायन्स रिटेलमध्ये 1,875 कोटींची अतिरिक्त गुंतवणूक करणार आहेत. यानंतर RRVL मध्ये सिल्व्हर लेक आणि त्यांच्या सह-गुंतवणूकदारांची गुंतवणूक एकूण 9375 कोटींवर पोहोचली आहे. आता सिल्व्हर लेकची रिलायन्स रिटेलमधील एकूण भागीदारी 2.13 टक्के झाली आहे. 30 सप्टेंबर रोजी करण्यात आलेली ही दुसरी आणि गेल्या 3 आठवड्यातील चौथी गुंतवणूक आहे. रिलायन्स स्टॉक एक्सचेंज फायलिंग (Stock Exchange Filing) मध्ये दिलेल्या माहितीनुसार या गुंतवणुकीनंतर रिलायन्स रिटेल प्री-इक्विटी मूल्य 4.285 लाख कोटी आहे.
जून महिन्यात मुबादला इंडस्ट्रीजने जीओमध्ये 9,093 कोटींची गुंतवणूक केली.जीओमधील गुंतवणूकदार आता रिलायन्समध्येही गुंतवणूक करण्यात उत्सुक आहेत. मुबादला इंवेस्टमेंट कंपनी अबुदाबी इन्वेस्टमेंट अथॉरिटीनंतर दुसरी मोठी गुंतवणूकदार ठरली आहे. कोरोनाच्या काळातसुद्धा रिलायन्स इन्डस्ट्रीजमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. भारतात गुंतवणूक करण्यासाठी जगातील अनेक मोठ्या कंपन्या पुढे येत आहेत आणि त्यांची पहिली पसंती रिलायन्सला मिळत आहे