मुंबई, 1 मार्च : कोरोनाच्या काळातही (Corona Crises) भारतात श्रीमंतांची संख्या सातत्याने वाढत आहे. 3 कोटी अमेरिकन डॉलर (सुमारे 226 कोटी रुपये) किंवा त्याहून अधिक संपत्ती असलेल्या देशातील अतिश्रीमंत लोकांच्या संख्येत गेल्या वर्षी 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिअल इस्टेटबाबत सल्ला घेणाऱ्या ‘नाइट फ्रँक’ने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. अहवालानुसार, अतिश्रीमंत लोकांच्या संख्येत ही वाढ शेअर बाजारातील (Share Market) तेजी आणि डिजिटल क्रांतीमुळे झाली आहे. 2021 मध्ये जागतिक स्तरावर अब्जाधीशांच्या संख्येमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 748 अब्जाधीशांसह अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे, तर 554 अब्जाधीशांसह चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. 145 अब्जाधीशांसह भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ‘द वेल्थ रिपोर्ट 2022’ संपत्ती सल्लागार नाईट फ्रँक यांनी ‘द वेल्थ रिपोर्ट 2022’ ने त्यांच्या ताज्या आवृत्तीत सांगितले की, जागतिक स्तरावर अतिश्रीमंतांची संख्या 9.3 टक्क्यांनी वाढून 2021 मध्ये 6,10,569 झाली आहे, जी मागील वर्षी 5,58,828 होती. Demat Accounts: शेअर बाजारातील गुंतवणूकरांच्या संख्येत वाढ, CDSL कडे 6 कोटी अॅक्टिव्ह डिमॅट अकाऊंट्स नाइट फ्रँक यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 2021 मध्ये भारतातील अतिश्रीमंत लोकांची संख्या 11 टक्क्यांनी वाढली आहे. बंगळुरूमध्ये श्रीमंतांच्या संख्येत सर्वाधिक वाढ अहवालानुसार, भारतात हाय नेटवर्थ असलेल्या श्रीमंतांची संख्या 2021 मध्ये 13,637 होती, जी मागील वर्षी 12,287 होती. अत्यंत श्रीमंत लोकांच्या संख्येत सर्वाधिक वाढ बंगळुरूमध्ये दिसून आली. तेथे त्यांची संख्या 17.1 टक्क्यांनी वाढून 352 झाली. त्यापाठोपाठ दिल्ली (12.4 टक्क्यांनी 210 वर) आणि मुंबई (9 टक्क्यांनी 1,596 वर) आहे. GST Collection: फेब्रुवारीत एकूण 1.33 लाख कोटींचं जीएसटी संकलन, महाराष्ट्राच्या संकलनात 21 टक्के वाढ आशियाचा वाटा 36 टक्के अब्जाधीशांच्या क्लबमध्ये, 2021 मध्ये जगातील अब्जाधीशांपैकी 36 टक्के योगदान देत आशियाने आघाडी घेतली आहे. 2021 मध्ये अब्जाधीशांच्या लोकसंख्येमध्ये अमेरिका आणि चीननंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्रथमच, नाइट फ्रँकने जगातील UHNWI लोकसंख्येच्या ‘नेक्स्ट जनरेशन’च्या आकाराचे परीक्षण केले आहे. तसेच, मालमत्ता बाजारासाठी याचा अर्थ काय असू शकतो याचे मूल्यांकन केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.