मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Reliance Foundation Scholarship साठी करा अर्ज, 100 विद्यार्थ्यांना मिळणार संधी; वाचा सविस्तर

Reliance Foundation Scholarship साठी करा अर्ज, 100 विद्यार्थ्यांना मिळणार संधी; वाचा सविस्तर

कॉर्पोरेट जगतात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी दिल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या स्कॉलरशिपसाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. रिलायन्स फाउंडेशनकडून गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील ही स्कॉलरशिप दिली जाणार आहे.

  • Published by:  desk news

मुंबई, 20 डिसेंबर: रिलायन्स फाऊंडेशनच्या (Reliance Foundation) वतीनं देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिपसाठी (Scholarship) अर्ज (Application process begins) मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सामाजिक उपयोगांसाठी तंत्रज्ञानाचा वापर (Technology for social goods) या संकल्पनेवर आधारित ही स्कॉलरशिप असणार आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, (AI) कॉम्प्युटर सायन्स, (Computer Science) मॅथेमॅटिक्स आणि कॉम्प्युटिंग, (Mathematics and Computing) इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगला (Electric and Electronic Engineering) शिकणाऱ्या फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट (UG) आणि आणि पोस्ट ग्रॅज्युएट (PG) विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येणार आहेत.

विद्यार्थ्यांना मिळणार ग्रँट

या स्कॉलरशिपसाठी अर्ज करताना कुठलीही प्रवेश फी विद्यार्थ्यांना भरावी लागणार नाही. सामाजिकदृष्ट्या उपयोगी ठरणारं तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि उत्तेजन मिळावं, या उद्देशानं ही स्कॉलरशिप देण्यात येत आहे. देशभरातील कुठल्याही विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकणार आहेत. देशभरातील 60 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 4 लाखांपर्यंतची ग्रँट यात देण्यात येईल, तर 40 पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना 6 लाखांपर्यंतचं अवॉर्ड देण्यात येणार आहे. कॉर्पोरेट जगतात रकमेच्या दृष्टीनं ही सर्वात मोठी स्कॉलरशिप असल्याचं सांगितलं जात आहे.

हा आहे उद्देश

विज्ञानाचा उपयोग सामाजिक हितासाठी करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या विज्ञान शाखांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक भान ठेऊन प्रयोग करता यावेत, यासाठी ही स्कॉलरशिप देण्यात येत आहे. 2021 साली अंडर आणि पोस्ट ग्रॅज्युएट मिळून 76 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात आली होती. आर्टिफिशिअल इंजेलिजन्स आणि कॉम्प्युटर सायन्स या क्षेत्रातील हे सर्व विद्यार्थी होते.

विद्यार्थ्यांचा होणार फायदा

विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाल्यामुळे विविध प्रयोगांसाठी त्यांना उत्तेजन तर मिळणार आहेच, याशिवाय इतरही अनेक संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहेत. स्कॉलरशिपच्या काळात विद्यार्थ्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील सर्वोच्च व्यक्तींचं मार्गदर्शन मिळणार असून त्यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.     त्याचप्रमाणं मेंटरिंग, इंटर्नशिप, वॉलिंटियरिंग आणि त्या क्षेत्रातील नेटवर्कमध्ये सहभाग असे इतरही अनेक फायदे विद्यार्थ्यांना होणार आहेत.

अशी असेल प्रक्रिया

  • ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं
  • प्रवेश हे स्पर्धात्मक निकषांवर निश्चित केले जातील
  • भारतातील आणि परदेशातील एक्सपर्ट यासाठी मुलाखती घेतील
  • मेरिटच्या आधारे स्कॉलरशिप दिली जाईल
  • सर्व सामाजिक-आर्थिक स्तरातील विद्यार्थ्यांना समान संधी असेल
  • अधिक माहितीसाठी विद्यार्थी https://www.scholarships.reliancefoundation.org/ या लिंकवर क्लिक करू शकतात.

First published:

Tags: Reliance group, Scholarship, Science, Technology