मुंबई, 12 फेब्रुवारी : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (ABRY) अंतर्गत तरुणांना सहज नोकऱ्या मिळवण्याची संधी देत आहे.
EPFO ने म्हटले आहे की रोजगाराच्या शोधात असलेले तरुण आता ABRY अंतर्गत 31 मार्च 2022 पर्यंत स्वतःची नोंदणी करू शकतात. या नोंदणीद्वारे कंपनीत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा पीएफ सरकार भरणार आहे. एवढेच नाही तर कंपनीच्या वतीने पीएफमध्ये जाणारी रक्कमही सरकार भरणार आहे.
2 वर्षांसाठी 24 टक्के योगदान
ABRY योजनेंतर्गत, सरकार कर्मचारी आणि नियोक्त्याचा भविष्य निर्वाह निधी (PF) मधील हिस्सा 2 वर्षांसाठी नियोजित करेल. यामुळे कंपन्यांना अधिक नोकऱ्या देण्यासही प्रोत्साहन मिळेल. योजनेचा लाभ सामील झाल्यापासून 24 महिन्यांपर्यंत मिळू शकतो. यामध्ये पगाराच्या 24 टक्के वाटा सरकार देणार आहे. कर्मचाऱ्याच्या वतीने 12 टक्के आणि नियोक्त्याच्या वतीने 12 टक्के भरले जातील.
योजनेची मुख्य अट
ज्या कर्मचाऱ्यांचा पगार 15 हजार रुपयांपेक्षा कमी असेल त्यांनाच ABRY योजनेचा लाभ दिला जाईल, असे सरकारने म्हटले आहे. कर्मचार्याचा पगार मासिक 15 हजारांची मर्यादा ओलांडताच, सरकारकडून त्यांच्या पीएफ खात्यात दिले जाणारे योगदान बंद केले जाईल. याशिवाय ज्या कंपनीत कर्मचाऱ्यांची संख्या 1000 पेक्षा जास्त असेल, त्यांनाही योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
CIBIL Score वाढवण्यासाठी 'हे' नियम पाळा, कर्ज मिळवण्यासाठी कधीच अडचण येणार नाही
72 लाख कर्मचाऱ्यांचा फायदा होण्याचा अंदाज
सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने सांगितले आहे की सुमारे 71.8 लाख नवीन कर्मचार्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. असे कर्मचारी जे 31 मार्च 2022 पर्यंत EPFO मध्ये नोंदणी करतील, त्यांना पुढील दोन वर्षांसाठी सरकारकडून पीएफ योगदानाचा लाभ दिला जाईल. ही योजना अशा कंपन्यांसाठी लागू होईल, ज्यांनी ऑक्टोबर 2020 पूर्वी EPFO मध्ये नोंदणी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.