मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Recurring Deposit : पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिटसाठी असा असतो कालावधी; वाचा सविस्तर

Recurring Deposit : पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिटसाठी असा असतो कालावधी; वाचा सविस्तर

आर्थिक नियोजन सर्वात महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे बचत (Saving) किंवा गुंतवणूक (Investment). आज मार्केटमध्ये बचतीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अशावेळी आपण नेमका कोणता पर्याय निवडावा, याविषयी मनात नक्कीच संभ्रम निर्माण होऊ शकतो.

आर्थिक नियोजन सर्वात महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे बचत (Saving) किंवा गुंतवणूक (Investment). आज मार्केटमध्ये बचतीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अशावेळी आपण नेमका कोणता पर्याय निवडावा, याविषयी मनात नक्कीच संभ्रम निर्माण होऊ शकतो.

आर्थिक नियोजन सर्वात महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे बचत (Saving) किंवा गुंतवणूक (Investment). आज मार्केटमध्ये बचतीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अशावेळी आपण नेमका कोणता पर्याय निवडावा, याविषयी मनात नक्कीच संभ्रम निर्माण होऊ शकतो.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही उद्दिष्टं असतात. उद्दिष्टपूर्तीसाठी प्रत्येकजण अविरत कष्ट घेत असतो. मात्र उद्दिष्ट कोणतंही असलं तरी ते पूर्ण होण्यासाठी आर्थिक नियोजन (Financial Planning) काटेकोर असणं गरजेचं असतं. यासाठी काही जण उद्दिष्टांची शॉर्ट टर्म (Short Term) आणि लॉंग टर्म (Long Term) अशी विभागणी करतात. अर्थात यामुळे नियोजन सोपं जातं. या आर्थिक नियोजनामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे बचत (Saving) किंवा गुंतवणूक (Investment). आज मार्केटमध्ये बचतीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अशावेळी आपण नेमका कोणता पर्याय निवडावा, याविषयी मनात नक्कीच संभ्रम निर्माण होऊ शकतो. परंतु, संभ्रमात न पडता सुरक्षित आणि योग्य परतावा देणाऱ्या योजना फायदेशीर ठरतात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे.

सध्याच्या काळात रिकरिंग डिपॉझिट (Recurring Deposit) आणि फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) हे बचतीसाठी सर्वात सुरक्षित पर्याय समजले जातात. खासगी, सहकारी आणि शासकीय बॅंका, वित्तीय संस्था आणि पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) तुम्ही या माध्यमातून बचत करू शकता. यात पोस्ट ऑफिस हा सर्वात सुरक्षित असा पर्याय मानला जातो. पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिटसाठी विशेष सुविधा दिली जाते. रिकरिंग डिपॉझिट किंवा आरडी (RD) ही मध्यम मुदतीसाठी बचतीचं एक उत्तम साधन मानलं जातं. भविष्यकाळातील संभाव्य आपत्कालीन परिस्थितींना तोंड देताना आर्थिक टंचाई भासू नये म्हणून अनेकजण हाच पर्याय निवडतात. पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून आरडीत बचत सुरु करण्यासाठी कालावधीसह काही नियम आहेत. बचतीचा कालावधी, व्याज दर आणि रिटर्न्स याविषयीची सविस्तर माहिती आता जाणून घेऊया...

पोस्ट ऑफिसमध्ये बचत करणं हा खरंतर अत्यंत सुरक्षित मार्ग समजला जातो. आज शासनाच्या बचतीच्या अनुषंगाने अनेक योजना आहेत की ज्यांची अंमलबजावणी पोस्टाच्या माध्यमातून केली जाते. रिकरिंग डिपॉझिटच्या माध्यमातून तुम्ही बचत करण्याचा विचार करत असाल तर पोस्टाइतका खात्रीशीर पर्याय दुसरा नाही. पोस्ट ऑफिसमध्ये आरडी अकाउंटमधील बचतीवर 1 एप्रिल 2020 च्या नियमानुसार, सध्या 5 वर्षाकरिता 5.8 टक्के असा व्याज दर दिला जात आहे. पोस्ट ऑफिसमध्ये `आरडी`चा किमान कालावधी हा 5 वर्षाचा असतो. 5 वर्षापेक्षा अधिक कालावधीकरिता देखील तुम्ही बचत सुरू ठेवू शकता. कारण तरतुदीनुसार तुम्हाला कमाल 10 वर्षापर्यंत `आरडी`त बचत करता येऊ शकते. तुम्ही जर 5 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी `आरडी`त बचत सुरु ठेवली तर दर तिमाहीत चक्रवाढ पध्दतीनं होणारं व्याजही मिळतं.

हे वाचा - TISS Recruitment: टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबईत देणार Jobs; पगार बघून व्हाल थक्क

पोस्ट ऑफिसमध्ये आरडी अकाउंट सुरु करतानाही काही विशेष बाबी ध्यानात घेणं गरजेचं आहे. पोस्ट ऑफिसमध्ये `आरडी`च्या माध्यमातून तुम्ही वैयक्तिक (Individual) किंवा जॉईंट अकाउंट (Joint Account) सुरू करून बचत करू शकता. अल्पवयीन व्यक्ती पालकांच्या देखरेखीखाली हे अकाउंट सुरू करू शकतात. एखाद्या व्यक्तीनं हे अकाउंट सुरू केलं आणि नंतरच्या काळात तो अनिवासी भारतीय (NRI) झाला तरी त्याला नॉन-रिपेट्रिशन तत्वावर मॅच्युरिटी होईपर्यंत खातं सुरू ठेवता येतं.

हे वाचा - Special Story : पंतप्रधान आवास योजनेची ही वैशिष्ट्ये आणि लाभ जाणून घ्या

पोस्ट ऑफिसमध्ये आरडी अकाउंट सुरु करताना ते कोणत्याही महिन्याच्या 1 ते 15 तारखेदरम्यान सुरु करावं. म्हणजे अकाउंट सुरू झाल्यावर दरमहा बचतीची रक्कम 1 ते 15 तारखेदरम्यान निश्चित केलेल्या तारखेलाच जमा करता येते. कोणत्याही महिन्याच्या 15 तारखेनंतर सुरु केलेल्या अकाउंटमध्ये महिनाअखेरपर्यंत निश्चित केलेली बचत रक्कम जमा करणं आवश्यक आहे. पोस्टाच्या आरडी अकाउंटमध्ये तुम्ही किमान 100 रुपये प्रतिमहिना किंवा 10 रुपयांच्या पटीत कितीही रक्कम बचत म्हणून निश्चित करू शकता.

पोस्ट ऑफिसमध्ये `आरडी`त बचत करताना 5 वर्षाच्या कालावधीत दरमहा एक याप्रमाणे एकूण 60 ठेवी संख्या होणं अपेक्षित आहे. तुम्ही पोस्ट ऑफिसमधील रिकरिंग अकाउंट 3 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर केव्हाही बंद करू शकता. परंतु, मुदतीपूर्वी बंद केलेल्या अकाउंटवर तुम्हाला कोणतेही व्याज दिले जात नाही. त्याऐवजी पोस्ट ऑफिसमधील तुमच्या बचत खात्यावर तुम्हाला व्याज दिलं जातं. तसेच काही कारणास्तव संबंधित व्यक्ती बचतीची रक्कम या आरडी अकाउंटमध्ये काही कालावधीसाठी जमा करू शकला नाही. तर नियमानुसार असे 4 डिफॉल्टस (Defaults) ग्राह्य धरले जातात. मात्र त्यानंतरही रक्कम जमा झाली नाही तर अकाउंट बंद केलं जातं. मात्र असं बंद केलेलं अकाउंट पुढील (5 व्या) डिफॉल्टनंतर 2 महिन्याच्या कालावधीत पुन्हा सुरू करता येतं. नियमानुसार, बचतीच्या रकमेच्या प्रत्येक 100 रुपयांसाठी 1 रुपया डिफॉल्ट दंड आकारला जातो.

हे वाचा - Special Story : घरखरेदीसाठी स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस कसे ठरवले जातात?

संबंधित व्यक्ती जर दरमहा असलेली बचती रक्कम आगाऊ (Advance) जमा करू इच्छित असेल तर त्यास पोस्ट ऑफिसकडून विशेष सूट दिली जाते. ही सूट फार मोठी नसली तरी ती खातेदारास निश्चितच मदत करणारी ठरते. जर तुम्ही 6 हप्ते आगाऊ भरले तर तुम्हाला प्रत्येक 100 रुपयांवर 10 रुपये सूट दिली जाते. तसेच जर तुम्ही 12 हप्ते आगाऊ भरले तर तुम्हाला प्रत्येक 100 रुपयांवर 40 रुपये सूट पोस्ट ऑफिसकडून दिली जाते.

पोस्ट ऑफिसमध्ये आरडीच्या माध्यमातून केलेली बचत ही करपात्र नसते. तसेच अधिक व्याज दराचा लाभ मिळवण्यासाठी ही बचत अधिक फायदेशीर ठरते.

First published:

Tags: Post office, Post office bank