पुणे, 16 जुलै: प्रत्येकजण आपलं घर सुंदर आणि टापटिप ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी घरात घराला साजेसं आणि चांगल्या दर्जाचं फर्निचर बनवलं जातं. फर्निचरचे अनेक प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध असतात. पुण्यातही विविध प्रकारची फर्निचर मिळणारी खास मार्केट आहेत. असंच एक फर्निचर मार्केट औंध हिंजवडी रोडवर वाकड येथील मानकर चौक इथे आहे. तिरुपती फर्निचर मार्केटमधून तुम्ही स्वस्तात मस्त फर्निचर खरेदी करू शकता. फर्निचरचे हे ऑप्शन उपलब्ध फर्निचर मार्केटमध्ये अनेक व्हराइटी उपबल्ध आहेत. कपाट, सोफा, डायनिंग टेबल, गादी, सेंटर टेबलं, ऑफिस टेबल तसंच लाकडी आणि मेटल डायनिंग टेबलं अशा फर्निचर वस्तू पाहायला मिळतात. त्याच प्रमाणे घरात ठेवायचा देव्हारा देखील उपलब्ध आहे. या ठिकाणी शहर परिसरातील लोक आवर्जून भेट देऊन फर्निचरची खरेदी करत असतात.
किती आहेत किमती? बेडची किंमत 9 हजार 500 पासून ते 20 हजारच्या रेंजमध्ये आहे. तसेच सोफा देखील 12 ते 13 हजार रुपयांत उपलब्ध आहेत. सेंटर टेबलं 1500 पासून 5 हजार पर्यंत पाहिजे त्या पद्धतीचे मिळतात. सगळ्यात कमी किमतीत म्हणजे 700 रुपये मध्ये देव्हारा उपलब्ध आहे. चांगल्या क्वालिटीचे व कमी किमतीत फर्निचर इथे खरेदी करू शकता. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चॉईसही उपलब्ध आहेत. बनवून किंवा रेडिमेड असे दोन्ही पर्याय याठिकाणी उपलब्ध आहेत. टिकाऊ आणि आकर्षक हॅण्डबॅग्जची करा कमी किंमतीमध्ये खरेदी, पुण्यातील ‘या’ मार्केटमध्ये आहे संधी PHOTOS फर्निचरचे कुठले प्रकार असतात? लाकडी फर्निचर, बांबू फर्निचर, विकर किंवा रॅटन फर्निचर, धातूचे फर्निचर, प्लॅस्टिक फर्निचर, ज्याला अॅक्रेलिक फर्निचर असेही म्हणतात. काचेचे फर्निचर, काँक्रीट फर्निचर, बॉम्बे फर्निचर, ज्याला ब्लॅकवुड फर्निचर असेही म्हणतात. असे फर्निचरचे विविध प्रकार तिरुपती मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.