जाहिरात
मराठी बातम्या / मनी / नवीन वर्षात पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये बचत करून मिळवा जास्त उत्पन्न

नवीन वर्षात पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये बचत करून मिळवा जास्त उत्पन्न

 पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये बचत करून मिळवा जास्त उत्पन्न

पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये बचत करून मिळवा जास्त उत्पन्न

नवीन वर्षात पोस्ट ऑफिसच्या योजनांच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न मिळवण्याचं नियोजन करत असलात, तर आता तुम्ही या योजनांमध्ये बचत सुरू करू शकता.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 02जानेवारी: गेल्या काही महिन्यांपासून टर्म डिपॉझिट, सेव्हिंग्ज स्कीम आदींवर मिळणारा व्याजदर थोडा कमी होता; मात्र नवीन वर्षाच्या निमित्ताने केंद्र सरकारने देशवासीयांना एक भेट दिली आहे. एनएससी, पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट, सीनिअर सिटीझन सेव्हिंग्ज स्कीम आदींवरचा व्याजदर केंद्राने वाढवला आहे. नवीन वर्षात पोस्ट ऑफिसच्या योजनांच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न मिळवण्याचं नियोजन करत असलात, तर आता तुम्ही या योजनांमध्ये बचत सुरू करू शकता. हे नवीन व्याजदर 1 जानेवारी 2023पासून लागू झाले आहेत. ‘टीव्ही नाइन हिंदी’ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यापूर्वी केंद्र सरकारने डिसेंबर तिमाहीसाठी काही अल्पबचत योजनांच्या व्याज दरात वाढ केली होती. ही वाढ 0.30 बेसिस पॉइंट होती. केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी अल्पबचत योजनांच्या व्याजदराचा आढावा घेतं; मात्र याबाबतचा अंतिम निर्णय अर्थ मंत्रालय घेतं. आता केंद्र सरकारने एनएससी, पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट आणि सीनिअर सिटीझन सेव्हिंग्ज स्कीमवर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ 1 जानेवारी 2023 पासून लागू झाली आहे; मात्र पीपीएफच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हेही वाचा - HDFC बँकेचं हे डेबिट कार्ड आहे खूपच उपयुक्त, फायदे ऐकून व्हाल चकित अर्थ मंत्रालयाच्या नोटिफिकेशननुसार, जानेवारी ते मार्च या तिमाहीकरिता काही सेव्हिंग्ज स्कीमच्या व्याजदरात 0.20 ते 1.10 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये बचत करून तुम्ही आता अधिक नफा कमवू शकता. कारण व्याजदर वाढल्याने साहजिकच उत्पन्नदेखील वाढणार आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अर्थात एनएससीवर 1 जानेवारीपासून 7 टक्के दराने व्याज मिळेल. यापूर्वी हा दर 6.8 टक्के होता. सीनिअर सिटीझन सेव्हिंग्ज स्कीममध्ये बचत केल्यास तुम्हाला 1 जानेवारीपासून 8 टक्के व्याज मिळेल. हा दर पूर्वी 7.6 टक्के होता. मासिक उत्पन्न योजनेचा व्याजदरही 6.7 टक्क्यांवरून 7.1 टक्के झाला आहे. एक ते पाच वर्षं कालावधीच्या पोस्ट ऑफिसच्या टर्म डिपॉझिट स्कीमवरचा व्याजदर 1.1 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजनेसारख्या योजनांच्या व्याजदरात जानेवारी ते मार्च या तिमाहीकरिता कोणतीही सुधारणा केलेली नाही. मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेचा सध्या असलेला 7.6 टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेच्या व्याजदरातही कोणताही बदल झालेला नाही. डिसेंबरच्या तिमाहीप्रमाणे, मार्च तिमाहीतही तो 7.1 टक्क्यांवर कायम आहे. किसान विकास पत्र योजनेच्या व्याजदरात सरकारने वाढ केली आहे. 123 महिने कालावधीच्या किसान विकास पत्रावर डिसेंबरच्या तिमाहीत 7 टक्के व्याजदर दिला जात होता. आता 7.2 टक्के व्याजदर मिळणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात