जाहिरात
मराठी बातम्या / मनी / PNB Alert! बदलणार चेक पेमेंटची पद्धत, जाणून घ्या कधीपासून लागू होणार हा नियम

PNB Alert! बदलणार चेक पेमेंटची पद्धत, जाणून घ्या कधीपासून लागू होणार हा नियम

PNB Alert! बदलणार चेक पेमेंटची पद्धत, जाणून घ्या कधीपासून लागू होणार हा नियम

देशातली दुसरी सर्वांत मोठी सरकारी कर्जदाता बँक असलेली पंजाब नॅशनल बँक (PNB Latest News) ग्राहकांसाठी पेमेंट नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करणार आहे. पीएनबी 4 एप्रिलपासून पॉझिटिव्ह पे सिस्टीम (Positive Pay system) लागू करत आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी: देशातली दुसरी सर्वांत मोठी सरकारी कर्जदाता बँक असलेली पंजाब नॅशनल बँक (PNB Latest News) ग्राहकांसाठी पेमेंट नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करणार आहे. पीएनबी 4 एप्रिलपासून पॉझिटिव्ह पे सिस्टीम (Positive Pay system) लागू करत आहे. या अंतर्गत, आता व्हेरिफिकेशन केल्याशिवाय चेक पेमेंट (Cheque payment) होणार नाही. नियमानुसार आता व्हेरिफिकेशन  झालं नाही, तर चेक बाउन्स होईल. pnbindia.in या पीएनबीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 4 एप्रिल 2022 पासून पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू केली जाईल. यानंतर, ग्राहकांनी शाखा किंवा डिजिटल चॅनेलद्वारे 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचा चेक जारी केल्यास पीपीएस (PPS) कन्फर्मेशन अनिवार्य असेल. ग्राहकांना अकाउंट नंबर, चेक नंबर, चेक अल्फा, चेकची तारीख, चेकची रक्कम आणि लाभार्थ्याचं नाव द्यावं लागेल. पीएनबीने म्हटलं आहे, की ग्राहक 1800-103-2222 किंवा 1800-180-2222 या क्रमांकावर कॉल करून पीपीएसचे संपूर्ण तपशील मिळवू शकतात. तसंच ग्राहक बँकेच्या अधिकृत वेबसाइटद्वारेदेखील संपूर्ण माहिती गोळा करू शकतात. हे वाचा- आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या अंमलबजावणीला केंद्राची मंजुरी, 1600 कोटींची तरतूद चेक पेमेंट होईल सुरक्षित रिझर्व्ह बँकेने 1 जानेवारी 2022 पासून फ्रॉड पकडण्याचं टूल म्हणून पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू करण्याचे निर्देश दिले होते. आतापर्यंत अनेक बँकांनी त्याची अंमलबजावणी केली आहे. पीपीएसच्या मदतीने चेक पेमेंट सुरक्षित होईल. तसंच चेक क्लिअरन्स कमी वेळात होईल. चेक घेऊन जागोजागी फिरावं लागणार नाही. पीपीएस फसवणूक कशी रोखेल? पीपीएसअंतर्गत, चेक जारी करणाऱ्याला चेकचा तपशील एसएमएस, मोबाइल अ‍ॅप, नेट बँकिंग किंवा एटीएमद्वारे बँकेला द्यावा लागेल. चेक क्लिअरन्सला बँकेत गेल्यावर खातेदाराने दिलेल्या माहितीची पडताळणी केली जाईल. या माहितीत काही तफावत आढळल्यास चेक रिजेक्ट केला जाईल. पंजाब नॅशनल बँकेनं म्हटलं आहे, की पीपीएस कन्फर्मेशन नसल्यास चेक परत केला जाईल. हे वाचा- LIC IPO मध्ये परदेशी गुंतवणुकीला परवानगी, 20 टक्के FDI ला केंद्राची मंजुरी ऑनलाइन पद्धतीने बँकेचे व्यवहार करण्याचं प्रमाण वाढलं आहे; मात्र अद्यापही मोठे व्यवहार अनेक जण चेकचा वापर करून करतात. व्यवसाय करणाऱ्यांकडून चेकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असतो. पॉझिटिव्ह पे सिस्टीममुळे आता चेकने व्यवहार करणे हे अधिक सुरक्षित होणार आहे. त्याचा बँकेच्या ग्राहकांना चांगला फायदा होऊ शकतो. पीपीएसबाबत अधिक माहिती बँकेने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरदेखील उपलब्ध करून दिली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: pnb , pnb bank
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात