मराठी बातम्या /बातम्या /मनी /

PM Modi Investment Savings Tips: ‘या’ सरकारी योजनेत आहे पंतप्रधान मोदींची गुंतवणूक, असा ठेवतात पैशांचा हिशोब

PM Modi Investment Savings Tips: ‘या’ सरकारी योजनेत आहे पंतप्रधान मोदींची गुंतवणूक, असा ठेवतात पैशांचा हिशोब

PM Modi Investment Savings Tips: ‘या’ सरकारी योजनेत आहे पंतप्रधान मोदींची गुंतवणूक, असा ठेवतात पैशांचा हिशोब

PM Modi Investment Savings Tips: ‘या’ सरकारी योजनेत आहे पंतप्रधान मोदींची गुंतवणूक, असा ठेवतात पैशांचा हिशोब

Financial Freedom Tips from PM Modi: प्रत्येकाने अशा उपाययोजना वेळीच केल्या पाहिजेत, जेणेकरून आगामी काळात त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकेल. सल्लागार लहानपणापासूनच गुंतवणूक आणि बचत करण्याबाबत सल्ला देतात.

  • Published by:  Suraj Sakunde
मुंबई, 15 ऑगस्ट:  आजच्या युगात प्रत्येकजण स्वातंत्र्याच्या महत्त्वाबद्दल बोलतो. स्वातंत्र्य प्रत्येक अर्थानं आवश्यक आहे आणि जर ते आर्थिक बाबींशी संबंधित असलं तर त्याचं महत्त्व आणखी जास्त आहे. प्रत्येकानं वेळीच अशा उपाययोजना केल्या पाहिजेत, जेणेकरून येणाऱ्या काळात आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकेल. सल्लागारही लहानपणापासूनच गुंतवणूक आणि बचत करण्याबाबत सल्ला देतात. भविष्यासाठी चांगल्या फंडासोबतच विमा काढणंही खूप महत्त्वाचं असल्याचं ते सांगतात. बाजारात गुंतवणुकीचं अनेक पर्याय असले तरी त्यापैकी काहींमध्ये जोखीम असते तर काही पूर्णपणे जोखीममुक्त असतात. तुम्ही काही चांगले पर्याय शोधत असाल, तर तुम्ही पीएम मोदींचा पोर्टफोलिओ (PM Narendra Modi Investment Details) पाहून कुठे गुंतवणूक करायची याचा निर्णय घेऊ शकता. 1. बचत योजना आणि विमा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही अल्पबचत योजनांवर (Small Saving Schemes) विश्वास आहे. 31 मार्च 2022 पर्यंत पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 2 छोट्या बचतींमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. पीएम मोदींनी त्यांच्या संपत्तीचा खुलासा केला आहे, ज्याचा संपूर्ण तपशील पीएमओच्या अधिकृत वेबसाइट http://www.pmindia.gov.in वर पाहता येईल. पीएम मोदींची एकूण संपत्ती 2.23 कोटी रुपये आहे. त्यांचे पैसे बँक एफडी, जीवन विमा आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (NSC) यांसारख्या गुंतवणूक पर्यायांमध्ये आहेत. 2. पोस्ट ऑफिस NSC- पंतप्रधान मोदींनी पोस्ट ऑफिसची प्रसिद्ध स्कीम नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) मध्ये गुंतवणूक केली आहे. 31 मार्च 2022 पर्यंत NSC मध्ये त्यांची गुंतवणूक 9,05,105 रुपये आहे. NSC ही पोस्ट ऑफिस योजना आहे, ज्याची मॅच्युरिटी 5 वर्षांची आहे. या योजनेवर वार्षिक 6.8 टक्के व्याज मिळत आहे. ते पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेत उघडता येते. त्यात गुंतवणूक केल्यावर, आयकर विभागाच्या कलम 80C अंतर्गत कर लाभ देखील उपलब्ध आहे. हेही वाचा-  Independence Day 2022: स्वातंत्र्यानंतर घेतलेल्या या 5 धाडसी निर्णयांनी पालटलं देशाचं रुप; विकासाच्या वाटा झाल्या खुल्या 3. SBI FD- पीएम मोदींनीही एसबीआयमध्ये एफडी स्कीममध्ये पैसे गुंतवले आहेत. 31 मार्च 2022 पर्यंत त्यांची एफडीमध्ये गुंतवणूक 2,10,33,226 रुपये आहे. गुजरातमधील गांधीनगर येथील SBI चे N.S.C. शाखेत त्यांनी ही पैसे गुंतवले आहेत. एफडी हा गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय आहे. 5 वर्षांच्या FD वर, आयकर विभागाच्या कलम 80C अंतर्गत देखील कर लाभ उपलब्ध आहे. 4.जीवन विमा पॉलिसी- याशिवाय पीएम मोदींकडे 1,89,305 रुपयांची आयुर्विमा पॉलिसी आहे. दुसरीकडे, पीएम मोदींकडे 46,555 रुपये बँक बॅलन्स आहे, तर त्यांच्याकडे 35,250 रुपये रोख आहेत. पीएम मोदींकडे 4 सोन्याच्या अंगठ्या आहेत, ज्यांचे एकूण वजन 45 ग्रॅम आहे. त्यांची किंमत 17,30,631 रुपयांच्या जवळपास आहे. त्यांनी म्युच्युअल फंड, बाँड, डिबेंचर्स आणि शेअर्समध्ये एक पैसाही गुंतवला नाही. त्यांची जंगम मालमत्ता 1 वर्षात 28.13 लाखांनी वाढली आहे.
First published:

Tags: Narendra modi, Savings and investments

पुढील बातम्या