जाहिरात
मराठी बातम्या / मनी / PM Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास का होतोय उशीर, कारण आलं समोर

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास का होतोय उशीर, कारण आलं समोर

PM Kisan Yojana: 12वा हप्ता न येण्यामागं असू शकतं हे मोठं कारण, अजूनही 2 हजार रुपये कसे मिळवायचे? वाचा सविस्तर

PM Kisan Yojana: 12वा हप्ता न येण्यामागं असू शकतं हे मोठं कारण, अजूनही 2 हजार रुपये कसे मिळवायचे? वाचा सविस्तर

PM Kisan Samman Nidhi Yojana: आतापर्यंत एकूण 11 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. त्याचबरोबर लवकरच सरकार 12व्या हप्त्याचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 ऑक्टोबर: आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग कृषी क्षेत्रावर आधारित आहे. अशा परिस्थितीत देशाला गती देण्यात शेतीचा मोठा वाटा आहे. दुसरीकडे आजही अशा शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे, जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. गरिबीमुळे या शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे पाहता भारत सरकार एक महत्त्वाकांक्षी योजना राबवत आहे. या योजनेचं नाव प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी दोन हजार रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आतापर्यंत एकूण 11 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. त्याचबरोबर लवकरच सरकार 12व्या हप्त्याचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकते. त्याचवेळी 11वा हप्ता मिळाल्यानंतर शेतकरी 12व्या हप्त्याच्या पैशाची दीर्घकाळ प्रतीक्षा करत आहेत. भारत सरकार किसान सन्मान निधी योजनेच्या 12व्या हप्त्याचे पैसे सप्टेंबर महिन्यात जारी करेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तसे झाले नाही. यावेळी शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत बाराव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. लवकरच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. मात्र बारावा हप्ता मिळण्यास उशीर का होतोय, हाही प्रश्न अनेकांच्या मनात आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 12वा हप्ता जारी होण्यास उशीर होण्याचे मुख्य कारण म्हणजे भुलेख पडताळणी. भुलेख पडताळणीमुळे योजनेचा 12 वा हप्ता अद्याप जारी झालेला नाही. हेही वाचा:  PM Swanidhi Yojana: व्यवसायासाठी हमीशिवाय मिळतं कर्ज, ‘ही’ आहे सरकारची खास योजना मीडिया रिपोर्ट्सनुसार भारत सरकार ऑक्टोबर महिन्यात कोणत्याही तारखेला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता जारी करू शकते. मात्र याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

News18लोकमत
News18लोकमत

त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी अद्याप या योजनेत ई-केवायसी केलेली नाही. त्यांचे हप्त्याचे पैसे अडकू शकतात. सरकारने ई-केवायसीसाठी 31 ऑगस्ट 2022 ही अंतिम तारीख निश्चित केली होती. तथापि OTP आधारित ई-केवायसी अजूनही पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PM Kisan
  • First Published :
जाहिरात
जाहिरात