मुंबई : पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता 27 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. मात्र अजूनही काही शेतकरी असे आहेत ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. तुम्ही EKYC केलं असेल आणि तुम्ही लाभार्थी असाल तर चिंता करण्याचं कारण नाही.तुमच्या खात्यावर सरकारकडून हे पैसे जमा केले जाणार आहेत.
तुम्ही नोंदणी करताना जर काही चुका केल्या असतील किंवा चुकीचं बँक खातं निवडलं असेल तरी सुद्धा तुमचा हप्ता येणार नाही किंवा थांबवला जाण्याची शक्यता आहे. pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन याबाबत तपासणी करू शकता. याशिवाय तिथे टोलफ्री क्रमांक दिला आहे. त्यावर तुमची समस्या देखील तुम्ही सांगू शकता.
अलर्ट! तुम्ही केलंय का आधार पॅन लिंक? SMS द्वारे असं करा चेक
4000 रुपये कसे आणि कशाचे मिळणार?
पंतप्रधान किसान योजना ही नरेंद्र मोदी सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. योजनेचा भाग होण्यासाठी शेतकऱ्याला नोंदणी करावी लागेल. अर्ज करताना तुम्ही पीएम किसान पोर्टलवर राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारचे नाव अपलोड केले असेल, तर तुमच्या खात्यात हप्ते म्हणून 2000 जमा केले जातील.
ज्या शेतकऱ्यांचे दोन हप्ते अडकले आहेत. त्यांना दोन्ही हप्त्याचे मिळून 4 हजार रुपये येणार आहेत. 12 व्या हप्त्याचे 2 आणि 13 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये येणार आहेत. फॉर्म भरताना काही चूक झाली असेल तर ती लवकरात लवकर दुरुस्त करावी लागेल. त्यामुळे तुमच्या खात्यावर पूर्ण हप्ता जमा होईल. कोणत्याही कारणास्तव शेतकऱ्याचे नाव शासनाकडून नाकारले गेले तर तो पात्र ठरणार नाही.
कसं करायचं स्टेटस चेक?
वेबसाइटवर गेल्यानंतर उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरवर क्लिक करा. यानंतर, लाभार्थी स्थिती पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर एक नवीन पेज सुरू होईल. आता तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर टाका. यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.