नवी दिल्ली, 21 मार्च : पीएम आवास योजनेतील (PM Awas Yojna) हेराफेरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) नियमांमध्ये बदल केला आहे. जर तुम्हीही या योजनेअंतर्गत घर घेतले असेल तर आता त्या घरात पाच वर्षे राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुम्ही त्या घरात राहत नसाल किंवा ते भाड्याने दिले असेल तर ते घर तुमच्याकडून परत घेतले जाईल. तसेच तुम्ही जमा केलेले पैसे परत केले जाणार नाहीत. म्हणजे पीएम आवास योजनेंतर्गत मिळालेल्या घरात पाच वर्षे राहिल्यानंतरच अग्रीमेंट लीज डीडमध्ये बदलला जाईल. कोणते नियम बदलले सध्या ही घरे भाडेतत्त्वावर नोंदणीकृत कराराद्वारे दिली जातात. आता या घरांमध्ये तुम्ही राहत आहात की नाही हे केंद्र सरकार पाच वर्षे पाहणार आहे. आता तुमचा लीज डीडचा नोंदणीकृत करार तुम्ही त्या घरात राहत असतानाच बदलला जाईल. असे करण्यात अयशस्वी झाल्यास, विकास प्राधिकरण तुमच्यासोबत केलेला करार रद्द करेल. तसेच, तुम्ही जमा केलेले पैसे परत केले जाणार नाहीत. रशिया-युक्रेन युद्धाचा नाशिकच्या द्राक्ष निर्यातीला मोठा फटका; शेतकऱ्यांना कवडीमोलाने विकावी लागत आहेत द्राक्षं फ्लॅट फ्री होल्ड होणार नाहीत नवीन नियमानुसार, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरांमध्ये बांधण्यात आलेले फ्लॅट फ्री होल्ड असणार नाहीत. याचा फायदा आता फक्त गरजू लोकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत भाड्याने घर देण्याची हेराफेरी आता थांबणार आहे. नवीन नियमांमध्ये असेही म्हटले आहे की जर वाटप करणार्याचा मृत्यू झाला तर भाडेपट्टा कुटुंबातील सदस्यालाच हस्तांतरित केला जाईल. इतर कोणाला भाडेपट्ट्याचे हस्तांतरण होणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.