मुंबई : जागतिक बाजारात दोन दिवसांपासून क्रूड ऑइलचे दर वाढत आहेत, त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलवर झाला आहे. ब्रेंट क्रूडची किंमत पुन्हा एकदा प्रति बॅरल 85 डॉलरच्या पुढे गेली आहे. शुक्रवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल करण्यात आला आहे. सरकारी तेल कंपन्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गौतम बुद्ध नगर (नोएडा) येथे पेट्रोल 11 पैशांनी महाग होऊन 96.76 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 11 पैशांनी वाढून 89.93 रुपये प्रति लिटर झाले.गाझियाबादमध्ये आज पेट्रोल 14 पैशांनी स्वस्त झाले असून ते 96.44 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. डिझेल 13 पैशांनी घसरून 89.62 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. गुरुग्राममध्येही पेट्रोल 41 पैशांनी स्वस्त झालं असून 96.77 रुपये प्रति लिटर पैसे मोजावे लागणार आहेत. डिझेल 40 पैशांनी घसरले असून 89.65 रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे. दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झाला नाही.
फक्त 1 वर्षांसाठी FD करायचीये? या बँका देताय जबरदस्त रिटर्नदिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर आहे मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
तुम्ही घसबसल्या आता दर चेक करू शकता. तुम्ही या किमती फक्त एसएमएसद्वारेच तपासू शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक, त्यांच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेण्यासाठी, चेक RSP <डीलर कोड> लिहा आणि 9224992249 वर पाठवा.
CNG आणि PNG चे दर इतक्या रुपयांनी कमी होणार, मोदी सरकारचा मोठा निर्णयHPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE <डीलर कोड> एसएमएस पाठवतात. BPCL ग्राहकांनी RSP<डीलर कोड> 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर काही मिनिटांत तुम्हाला एसएमएसद्वारे नवीन किंमती मिळतील.