मुंबई, 3 एप्रिल : सध्या देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळ नागरिक हैराण आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज 80, 85, 75 पैशांनी वाढ होत आहे. रविवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. गेल्या दोन आठवड्यात आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आठ रुपयांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने सर्व विक्रम मोडले आहेत. येथे सामान्य पेट्रोलची किंमत 121.38 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 103.97 रुपये प्रति लिटर आहे. तसेच राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा दर 120.73 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 103.30 रुपये प्रति लिटर आहे.
परभणीत पेट्रोल डिझेल महाग का?
परभणीपासून 340 किमी अंतरावर असलेल्या मनमाड डेपोतून तेलाचा पुरवठा होत असल्याने महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर जास्त आहेत. परभणी पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमोल भेडसुरकर म्हणाले की, औरंगाबादला डेपो सुरू करण्याची मागणी आम्ही केली आहे. त्यामुळे तेलाचे दर प्रतिलिटर 2 रुपयांनी कमी होणार आहेत. तेलाच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणल्यास लोकांना जास्तीत जास्त दिलासा मिळेल. स्थानिक कराव्यतिरिक्त इंधनाचे दरही मालवाहतुकीवर अवलंबून असतात, असंही ते म्हणाले.
Tata च्या 'या' शेअरमुळे गुंतवणूकदारांची बक्कळ कमाई, दोन वर्षात 2 रुपयांचा शेअर 175 रुपयांवर
गेल्या 13 दिवसांत किंमत 11 वेळा वाढली
सरकारी तेल कंपन्यांनी आज म्हणजेच रविवारी पुन्हा तेलाच्या किमती वाढवल्या आहेत. गेल्या 13 दिवसांत ही 11वी वेळ आहे. देशाची राजधानी दिल्लीत 22 मार्चपासून पेट्रोल प्रतिलिटर 8 रुपयांनी महागले आहे. तब्बल चार महिन्यांनंतर पेट्रोल-डिझेल दर वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होणे जवळपास निश्चित झाले आहे.
LIC प्रीमियम भरण्यासाठी ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घसबसल्या ऑनलाईन जमा करा; कसं?
उत्पादन शुल्कात कपात
गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर रोजी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमती कमी करण्यासाठी उत्पादन शुल्कात कपात केली होती. पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी कमी झाले आहे. यानंतर राज्य सरकारांनीही सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी व्हॅटमध्ये कात्री लावली होती. मात्र आता पुन्हा पेट्रोल डिझेलचे दर भडकले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.